APMC Elections
APMC Elections Agrowon
ॲग्रो विशेष

Market Committee Election Update : जयसिंगपूर बाजार समितीत सात जागा बिनविरोध

Team Agrowon

Kolhapur Election News News : जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Jaisingpur Agriculture Produce Market Committee) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता अर्ज माघार घेण्याच्या मुदतीत, सोसायटी महिला प्रतिनिधी गट, ग्रामपंचायत अनुसूचित जाती गट, ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट व्यापारी व अडते गट आणि हमाल तोलाई गटातील अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे या गटाची निवडणूक बिनविरोध झाली.

बाजार समितीमध्ये सर्वपक्षीय आघाडीच्या सात जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. सोसायटी गटातील सर्वसाधारण, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी, भटक्या जाती व जमाती आणि ग्रामपंचायत सर्वसाधारण गटात ११ जागांकरिता, २१ अर्ज राहिल्यामुळे निवडणूक होणार आहे.

निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्व पक्षीय नेते मंडळींनी सर्वसमावेशक आघाडी तयार करण्याची भूमिका घेतली.

आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी खासदार राजू शेट्टी, श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, माजी आमदार उल्हास पाटील, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव, दत्तचे संचालक अनिल यादव, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सर्जेराव शिंदे, दत्तचे संचालक शेखर पाटील, शिवसेना ठाकरे गट तालुकाप्रमुख वैभव उगळे यांनी निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टिने गेले दोन दिवस प्रयत्न सुरू केले होते.

सर्वपक्षीय आघाडीच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आल्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेस वेग आला. आघाडीच्या वतीने जाहीर उमेदवारांव्यतिरिक्त अन्य उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.

यामुळे हमाल तोलाई गट, व्यापारी अडते गट, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल गट, ग्रामपंचायत अनुसूचित जाती गट, सोसायटी महिला राखीव या गटातील सर्व जागा बिनविरोध झाल्या.

बिनविरोध झालेले उमेदवार

सोसायटी महिला राखीव गट- दीपाली सतीश चौगुले (उदगाव), माधुरी बाबासो सावगावे (कुरुंदवाड), ग्रामपंचायत अनुसूचित जाती-सिद्राम दत्तू कांबळे (नांदणी), ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या दुर्बल-किरण कल्लाप्पा गुरव (टाकवडे), व्यापारी व आडते-प्रवीणकुमार मेघराज बलदवा व दादासो बाळकू ऐनापुरे (जयसिंगपूर), हमाल व तोलाई-भगवान पाटील (जयसिंगपूर).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

SCROLL FOR NEXT