Crop Damage Compensation Agrowon
ॲग्रो विशेष

Flood Damage Compensation : नांदेडला अतिवृष्टीग्रस्तांचे सव्वासातशे कोटी वितरित

Nanded Rain Flood : नांदेड जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी, पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या सात लाख ८३ हजार ९१५ शेतकऱ्यांसाठी शासनाकडून ८१२ कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती.

Team Agrowon

Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी, पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या सात लाख ८३ हजार ९१५ शेतकऱ्यांसाठी शासनाकडून ८१२ कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती. ही रक्कम प्राप्त झाल्यानंतर आजपर्यंत सहा लाख ६५ हजार ७६७ शेतकऱ्यांना ७२४ कोटी १७ लाख ८४ हजार १४८ रुपये वाटप करण्यात आले आहेत. वाटपाचे प्रमाण ९३ टक्के असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळाली.

नांदेड जिल्ह्यामध्ये एक ते तीन सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी झाली होती. यात खरिपातील जिरायती, बागायती व बहुवार्षिक पिकासह शेतजमीनीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला होता. यानंतर जिल्हा प्रशासनाकडून ग्रामस्थरीय समितीमार्फत नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्यात आदेश दिले होते.

यानुसार जिल्ह्यात पाच लाख ९६ हजार ५१७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. हा फटका जिल्ह्यातील सात लाख ८३ हजार ९१५ शेतकऱ्यांना बसला होता. यात नुकसानग्रस्तांच्या भरपाईसाठी ८१२ कोटी ३८ लाख साठ हजार रुपयांच्या सानुग्रह अनुदानाची मागणी जिल्हा प्रशासनाने छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांकडे केली होती.

या मागणीनुसार शासनाने नांदेडला ८१२ कोटींचा निधी मंजूर केला होता. हा निधी शासनाने प्राप्त करुन दिल्यानंतर तो शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला. आजपर्यंत सहा लाख ६५ हजार ७६७ शेतकऱ्यांना ७२४ कोटी १७ लाख ८४ हजार १४८ रुपये वाटप करण्यात आले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Crop Rotation: पीक फेरपालट, जमीन सुपीकतेवर भर

Watershed Management Technology: पाणलोटाला आधुनिक तंत्रज्ञानाची साथ

Green Economy: शेतीतून घडेल हरित अर्थव्यवस्था

Women Farmer Bill: भूमिकन्यांच्या पंखांत भरूया बळ

Soybean Seed Distribution: पुरंदरमधील पात्र शेतकऱ्यांना सोयाबीनचे बियाणे उपलब्ध

SCROLL FOR NEXT