Sesame Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Sesame Sowing : खानदेशात तिळाची लागवड मंद गतीने, क्षेत्र घटण्याची शक्यता

Sesame Cultivation : खानदेशात तीळ पेरणी यंदा कमी होईल, असे दिसत आहे. ही पेरणी डिसेंबरमध्ये व जानेवारीत सुरू झाली असून, पेरणी काही भागात सुरूच आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात तीळ पेरणी यंदा कमी होईल, असे दिसत आहे. ही पेरणी डिसेंबरमध्ये व जानेवारीत सुरू झाली असून, पेरणी काही भागात सुरूच आहे. तेलबिया पिकांत खानदेशात रब्बीत किंवा उन्हाळ हंगामात भुईमूग व सूर्यफूल अधिक असते.

तीळ पेरणी कमी असते. यंदा सूर्यफूल पेरणी पूर्ण झाली आहे. पेरणी अपेक्षेएवढी झालेली नाही, अशी स्थिती आहे. पेरणी या महिन्यातही काही शेतकऱ्यांनी केली आहे. तीळ पेरणी डिसेंबरच्या अखेरिस सुरू झाली आहे. या महिन्यातही काही भागात पेरणी सुरूच आहे. तीळ पिकाची पेरणी खानदेशात मागील १५ ते १८ वर्षांपासून सतत कमी झाली आहे.

पूर्वी तीळ पिकाची पेरणी सात ते आठ हजार हेक्टरवर केली जात होती. जेवढी पेरणी खरिपात केली जायची, तेवढीच पेरणी रब्बीतही शेतकरी करायचे. तीळ पिकासाठी जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, रावेर, अमळनेर, पाचोरा, जामनेर हा भाग प्रसिद्ध होता.

धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, नंदुरबारातील तळोदा, शहादा, नंदुरबार भागातही तीळ पेरणीला शेतकरी पसंती द्यायचे. परंतु कमी दर, अल्प उत्पादन यामुळे पेरणी कमी होत गेली. रब्बीत किंवा उन्हाळ हंगामात सुमारे ४०० हेक्टरवर तीळ पीक होते. यंदा मात्र तीळ पेरणी सुमारे २५० ते ३०० हेक्टरवर यंदा दिसत आहे.

तीळ पिकाची पेरणी काळ्या कसदार जमिनीत अधिकची केली आहे. काळ्या कसदार जमिनीत तीळचे उत्पादन एकरी दोन क्विंटलपेक्षा अधिक मिळते, असेही शेतकरी मानतात. कमी खर्च व कमी पाण्यात काळ्या कसदार जमिनीत तीळ पीक साध्य करणे शक्य आहे. अशा जमिनीत केळी लागवडीसाठी तीळ पिकाचे बेवड असल्यास पीक जोमदार येते, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

खरिपात खानदेशात सुमारे दीड हजार हेक्टरवर तीळ पेरणी अपेक्षित होती. परंतु पेरणी ३०० हेक्टरवरच झाल्याची माहिती मिळाली. तीळचे दर स्थिर किंवा चांगले आहेत. खरिपात उत्पादन कमी होते. कारण पावसानेही नुकसान झाले. अनेक खरेदीदार, कारखानदारांना तीळ अन्य राज्यांतून मागवावी लागते.

तीळ दर मागील वर्षभरापासून १२ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या खाली आलेले नाहीत. काही बाजार समित्यांत तीळला १३ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दरही मिळाला होता. जळगाव जिल्ह्यात सुमारे १५० ते २०० हेक्टरवर तीळ पीक आहे. तर धुळे नंदुरबारात मिळून सुमारे १०० हेक्टरवर तीळ पेरणी झाल्याची माहिती आहे.

बेवडसाठी केळीपट्ट्यात पेरणी

तीळची आवक अल्प असल्याने दर टिकून आहेत. या दरांचा लाभ मिळावा व केळी, अन्य पिकांसाठी बेवड मिळावे, फेरपालट व्हावी यासाठी काही केळी पट्ट्यातील केळी उत्पादक शेतकरी तीळ पेरणी करतात.

जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, रावेर, जळगाव, नंदुरबारातील शहादा, तळोदा, नंदुरबार या भागात तीळ पेरणी होणार आहे. धुळ्यातील शिरपूर तालुक्यातही काही भागात तीळ पेरणी झाली आहे. पेरणीसाठी अधिक गाळपक्षमता, वजनदार आणि कमी कालावधीत येणाऱ्या वाणांची निवड करण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT