
Parbhani News : कृषी व महसूल विभागांकडून परभणी जिल्ह्यातील २०२४-२५ मधील रब्बी हंगामातील पेरणी क्षेत्र ता.२४ जानेवारी रोजी अंतिम करण्यात आले आहे.त्यानुसार जिल्ह्यात ३ लाख २० हजार ४७८ हेक्टर (११८.३५ टक्के) पेरणी झाली आहे.
गतवर्षीच्या (२०२३-२४) तुलनेत यंदा रब्बीच्या पेरणीत २९ हजार १४७ हेक्टरने तर सरासरी क्षेत्राच्या तुलनेत ४९ हजार ६८४ हेक्टरने वाढ झाली आहे. सलग पाचव्या वर्षी रब्बीच्या सरासरी क्षेत्राहून अधिक पेरा झाला आहे.
यंदा गतवर्षीपेक्षा हरभरा, गहू, तीळ, जवसाच्या क्षेत्रात वाढ तर ज्वारी, करडई च्या क्षेत्रात घट झाली आहे. यंदाच्या रब्बी पेरणी क्षेत्रात एकट्या हरभरा पिकाचे पेरणी क्षेत्र ५९.३१ टक्के,ज्वारीचे ३०.०७ टक्के, गव्हाचे ९.६३ टक्के तर करडईचे ०.४२ टक्के आहे. परभणी जिल्ह्यात रब्बीचे सरासरी २ लाख ७० हजार ७९४ हेक्टर असतांना प्रत्यक्षात ३ लाख २० हजार ४७८ हेक्टरवर (११८.३५टक्के) पेरणी झाली आहे.
गतवर्षीच्या (२०२३-२४) तुलनेत यंदा तृणधान्यांमध्ये रब्बी ज्वारीच्या पेरणी क्षेत्रात १३ हजार २३० हेक्टरने घट झाली आहे. परंतु गव्हाच्या पेरणीत ४ हजार २५८ हेक्टरने व मक्याच्या क्षेत्रात २३४ हेक्टरने वाढ झाली आहे. कडधान्यांमध्ये हरभऱ्याच्या पेरणीत ३८ हजार २६९ हेक्टरने वाढ झाली आहे.गळितधान्यांत करडईच्या पेरणीत ६९८ हेक्टरने घट झाली आहे.
जवसाच्या क्षेत्रात २६ हेक्टरने तर तीळाच्या पेरणीत २६ हेक्टरने वाढ झाली आहे.यंदा तृणधान्यांची १ लाख ५४ हजार ८७६ पैकी १ लाख २८ हजार ६०१ हेक्टर (८३.०३ टक्के) पेरणी झाली आहे. कडधान्यांचे सरासरी क्षेत्र १ लाख १२ हजार २७२ असतांना यंदा प्रत्यक्षात १ लाख ९० हजार २५७ हेक्टर (१६९.४६ टक्के) पेरणी झाली.
गळितधान्यांची ३ हजार ६४४ पैकी १ हजार६२० हेक्टर (४४.४७ टक्के) पेरणी झाली. यंदा सोनपेठ वगळता उर्वरित ८ तालुक्यात सरासरीहून अधिक पेरणी झाली आहे.
पीकनिहाय अंतिम पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)
पीक सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी
ज्वारी ११३०८९ ९६३९४ ८५.२४
गहू ३९३०८ ३०८८४ ७८.५७
मका २०८६ ११६२ ५५.६९
हरभरा ११२१७० १९००९८ १६९.४७
करडई ३३७१ १३७५ ४०.८१
तीळ ३३.६४ ५७.१५ १६९.८९
जवस ११९ ४३ ३६.१३
परभणी जिल्हा रब्बी २०२४-२५
अंतिम पेरणी क्षेत्र स्थिती (हेक्टरमध्ये)
तालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी
परभणी ५७९०० ६१४१० १०६.०६
जिंतूर ५३७३० ५४३८८ १०१.२२
सेलू ३३५६१ ३४५३३ १०२.८९
मानवत १६११९ २४७५५ १५३.५८
पाथरी १७०७२ २४८८५ १४५.७६
सोनपेठ १५६९८ १५४५७ ९८.४६
गंगाखेड ३२०८६ ४०९२१ १२७.५३
पालम २०१३० २३५६२ ११७.०४
पूर्णा २४४९५ ४०५६६ १६५.६१
तुलनात्मक रब्बी पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)
वर्षे सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी
२०२०-२१ २१५९६१ २५९९०० १२०.३९
२०२१-२२ २१५९६१ २५४४६७ ११७.८२
२०२२-२३ २७०७९४ २९५४६२ १०९.११
२०२३-२४ २७०७९४ २९१३३१ १०७.५८
२०२४-२५ २७०७९४ ३२०४७८ ११८.३५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.