Onion Agrowon
ॲग्रो विशेष

Nafed Onion Procurement : ‘नाफेड’च्या कांदा खरेदी गैरव्यवहारांची गांभिर्याने चौकशी

Fraud Investigation : नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक दीपक अगरवाल यांनी बुधवारी (ता. २०) विधानसभा निवडणुकीच्या दिवशी नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणी जाऊन कांदा साठविलेल्या गोदामांची पाहणी केली

मुकूंद पिंगळे

Nashik News : केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत होणाऱ्या ‘नाफेड’च्या कांदा खरेदीचा मुद्दा लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेच्या प्रचारात गाजला.

दरम्यान, नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक दीपक अगरवाल यांनी बुधवारी (ता. २०) विधानसभा निवडणुकीच्या दिवशी नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणी जाऊन कांदा साठविलेल्या गोदामांची पाहणी केली. त्यामुळे ‘नाफेड’ कांदा खरेदी गैरव्यवहारांची गांभिर्याने चौकशी होत असल्याचे दिसून येत आहे.

केंद्राच्या पथकांच्या पाठोपाठ ‘नाफेड’ने एक सदस्यीय समिती व वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी दुसऱ्यांदा पाठविल्याने या गैरव्यवहाराचा गांभीर्याने तपास केला जात आहे, असे दिसत आहे.

माहिती देण्यास नेहमीप्रमाणे टाळाटाळ

व्यवस्थापकीय संचालक अगरवाल यांच्यासोबत ‘नाफेड’च्या पश्‍चिम विभागाच्या प्रमुख विना कुमारी आल्या होत्या. मात्र दौऱ्यात काय घडले, कुठे पाहणी केली या बाबत त्यांना संपर्क साधला असता त्यांनी अधिक बोलणे टाळले. त्यातच गेल्या दोन वर्षांपासून नाशिकमध्ये कांदा खरेदीची जबाबदारी पाहणारे शाखेचे व्यवस्थापक निखिल पाडदे निलंबित झाल्याचे समजते.

त्यांच्या जागेवर ‘नाफेड’चे संस्थात्मक पुरवठा व कांदा खरेदी विभागाचे सरव्यवस्थापक शंकर श्रीवास्तव यांच्याकडे प्रभारी कार्यभार देण्यात आला आहे. एकीकडे खुद्द अध्यक्ष जेठाभाई अहीर हे ‘नाफेड’मधील गैरव्यवहार समोर आणून त्याची माहिती देतात; मात्र अधिकारी व संबंधित माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचे सातत्याने समोर येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT