Cashew Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Cashew Farming : काजूसह अन्य फळबागायतदारांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे ; काजू बोर्डाच्या संचालकांकडे मागणी

Cashew Growers : काजू बागायतदारांसह सुपारी, नारळ उत्पादक विविध समस्यांमुळे मेटाकुटीस आले असून त्यांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : सिंधुदुर्गनगरी ः काजू बागायतदारांसह सुपारी, नारळ उत्पादक विविध समस्यांमुळे मेटाकुटीस आले असून त्यांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी फळबागायतदार संघाच्या वतीने काजू बोर्डाचे संचालक डॉ. परशुराम पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.

काजू बोर्डाचे संचालक डॉ. पाटील हे सिंधुदुर्गातील काजू बागायतदार आणि अन्य फळबागायतदारांशी चर्चा करण्यासाठी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. त्यांनी बांदा (ता. सावंतवाडी) येथे बागायतदारांशी चर्चा केली. या वेळी काजू बोर्डाचे अवधुत कदम, जिल्हा फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत, दोडामार्गचे अध्यक्ष संजय देसाई, सुरेश गावडे, आकाश नरसुले, प्रवीण परब यांच्यासह अन्य काजू, नारळ, सुपारी बागायतदार उपस्थित होते.

जिल्ह्यातील फळबागायतदारांनी, वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढत असून त्यांना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. फळबाग लागवड केल्यानंतर त्यातून दहा ते पंधरा वर्षे उत्पादन घेतले जाते. तरीदेखील दरवर्षी पीक पाहणीची असलेली अट रद्द करावी, काजू बीवरील आयात शुल्क वाढवावे जेणेकरून येथील काजू बीला चांगला दर मिळू शकेल, कुटीरोद्योगातून तरुणांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी कमी अटी-शर्तींची योजना अमंलात आणावी, काजू बोर्डाने एखादी योजना राबविण्यापूर्वी शेतकरी प्रतिनिधींची चर्चा करावी,

यासह विविध समस्या मांडतानाच त्यांनी या समस्यांबाबत गांभीर्याने विचार होणे आवश्यक असल्याचे सांगितले. डॉ. पाटील यांनी, या सर्व विषयांबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असे स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT