Serilculture Agrowon
ॲग्रो विशेष

Sericulture : आदिवासी भागातील हिरकणींकडून रेशीम शेती

Silk Farming : आदिवासी भागात रोजगाराच्या संधी अत्यल्प असल्याने येथील पुरुषांसह महिला स्थलांतर दिवाळीपासून करतात परिणामी त्यांची पिळवणूक व आर्थिक हानी होते.

मुकूंद पिंगळे

Nashik News : आदिवासी भागात रोजगाराच्या संधी अत्यल्प असल्याने येथील पुरुषांसह महिला स्थलांतर दिवाळीपासून करतात परिणामी त्यांची पिळवणूक व आर्थिक हानी होते. या समस्यांचा अभ्यास करून अभिव्यक्ती संस्थेने प्रकल्प हाती घेतला.

त्यातून आदिवासी भागातील महिला संघटित होऊन कोचरगाव (ता. दिंडोरी) येथील हिरकणी महिला बचत गटाच्या माध्यमातून एकीच्या ताकदीने रेशीम शेतीकडे वळाल्या आहेत. आदिवासी भागातील महिलांनी संघटितपणे सुरू केलेला हा राज्यातील पहिला उद्योग असावा, असे बोलण्यात येत आहे.

आदिवासी भागात सिंचन सुविधा कमी असल्याने भात, नागली, वरई अशी जिरायती पिके घेतली जातात. मात्र त्यातून मिळणारे मर्यादित उत्पन्न या कारणाने स्थलांतरित व्हावे लागते. तसेच वातावरणीय बदलांचा फटका बसत आहे. त्यामुळे शाश्वत उत्पन्नासाठी महिलांसाठी रेशीम शेतीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट आणि टीडीके इंडिया यांच्या सहकार्याने कोचरगावसारख्या आदिवासी भागातील महिलांनी बचत गटाच्या चळवळीच्या माध्यमातून नव्या संधीला सुरवात केली आहे.

त्यासाठी १० हजार तुतीच्या रोपांची लागवड केली असून पुढील तीन महिन्यात रेशीम कोश तयार होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. या शेडचे उद्घाटन टीडीके कंपनीचे व्यवस्थापक नितीन देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. सीएसआर फंडातून त्यासाठी निधी देण्यात आला आहे.

रेशीम शेती करताना दैनंदिन कामकाजाचे सूक्ष्म नियोजन करावे लागते. ठरविलेल्या ध्येयानुसार पहिले उत्पन्न मार्च अखेरीस घेवू शकतो, असा आशावाद अभिव्यक्ती संस्थेचे भिला ठाकरे यांनी व्यक्त केला. यावेळी हिरकणी बचतगटाच्या अध्यक्षा संगीता टोंगारे, ज्योती टोंगारे, तारा टोंगारे, यशोदा टोंगारे यांनी आपले अनुभव कथन केले.

संघटितपणे महिलांकडून रेशीम शेती

अभिव्यक्ती संस्थेने या महिलांना स्थानिक पातळीवर शाश्वत रोजगार संधी उपलब्ध देण्यासाठी संवाद साधून रेशीम शेती विषयी माहिती दिली. त्यानंतर महिलांना या कामाविषयी आत्मविश्वास निर्माण झाला.

पुढील टप्प्यात रेशीम शेतीची सुरवात करताना सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली.त्यांनतर जिल्हा रेशीम केंद्राकडे या गटाची नोंदणी करण्यात आली. यापूर्वी अभिव्यक्तीच्या माध्यमातून पुरुषांच्या बचत गटांसाठी रेशीम शेती सुरू करण्यात आली होती.त्यानंतर पहिल्यांदा महिलांसाठी हा व्यवसाय सुरू करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT