Sugarcane Maharashtra agrowon
ॲग्रो विशेष

One District One Product : परभणीत ‘एक जिल्हा एक उत्पादन’ अंतर्गत ऊस पिकाची निवड

Sugarcane Cultivation : केंद्र पुरस्कृत पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (पीएमएफई) योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यात एक जिल्हा एक उत्पादन (ओडीओपी) अंतर्गत ऊस या पिकाची निवड करण्यात आली आहे.

Team Agrowon

Parbhani News : केंद्र पुरस्कृत पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (पीएमएफई) योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यात एक जिल्हा एक उत्पादन (ओडीओपी) अंतर्गत ऊस या पिकाची निवड करण्यात आली आहे. या योजनेत जिल्ह्यात आतापर्यंत १३ कोटी ८१ लाख रुपये रकमेचे वैयक्तिक कर्ज प्रस्ताव मंजूर झाले असून, त्याद्वारे १८९ लाभार्थींनी उद्योग सुरू केले आहेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी दिली.

या योजनेअंतर्गत स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यात येणार असून ‘एक जिल्हा एक उत्पादन’साठी (ओडीओपी) परभणी जिल्ह्यात ऊस या पिकाची निवड करण्यात आली आहे. तर नॉन एक जिल्हा एक उत्पादन अंतर्गत नाशिवंत शेतीमाल त्यात फळे, भाजीपाला, तृणधान्य, कडधान्य, तेलबिया, मत्स्योत्पादन, मसाला पिके, दुग्ध व पशू उत्पादन, किरकोळ वन उत्पादने आदींमध्ये नवीन तसेच कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग लाभासाठी पात्र असतील.

या योजनेत लाभार्थींना ३५ टक्के अनुदान देय आहे. शिक्षणाची कोणतेही अट नाही. एक जिल्हा एक उत्पादन अंतर्गत व्यक्तिगत शेतकऱ्यांनी, शेतकरी गटांनी व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी उसापासून निर्मिती होणारे पदार्थ त्यात गूळ, गूळ पावडर, पाक रस आदी पदार्थ तसेच नॉन एक जिल्हा एक उत्पादन अंतर्गत विविध अन्न पदार्थ प्रक्रिया निर्मितीचे प्रकल्प सादर करावे.

प्रस्ताव सादर करू इच्छिणाऱ्यांसाठी संसाधन व्यक्तीचे पॅनेल तयार केले असून, जिल्हा संसाधन व्यक्तीमार्फत इच्छुकांनी प्रकल्प अहवाल तयार करणे, संबंधित उद्योगाची संपूर्ण माहिती मिळविण्याकरिता कृषी विज्ञान केंद्र, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र निःशुल्क प्रशिक्षण देणे, बँकेकडून प्रस्ताव मंजूर करण्यास मदत करणे, उद्योगासाठी लागणाऱ्या विविध परवानगी मिळविण्यासाठी मदत करतील.

वैयक्तिक अन्न प्रक्रिया उद्योगांकरिता, सामाईक पायाभूत सुविधा केंद्रासाठी ३५ टक्के अनुदान, मार्केटिंग व ब्रॅण्डिंगसाठी ५० टक्के सामाईक पायाभूत सुविधा, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग या प्रकरणांमध्ये निधीची कमाल मर्यादा विहित करण्यात येईल. अनुदान, स्वयं सहाय्यता बचत गट यांना बीज भांडवल लहान उपकरणे खरेदीसाठी ४० हजार रुपये प्रति सभासद या प्रमाणे एका गटास ४ लाख रुपये पर्यंत अनुदान देय राहील.

इच्छुक वैयक्तिक लाभार्थी, महिला बचत गट, शेतकरी गट शेतकरी उत्पादक कंपनी यांनी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, आत्मा कार्यालयास संपर्क करावा, असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pulse Research Centre: कडधान्य गुणवत्ता संशोधन केंद्रासाठी ११.३१ कोटी मंजूर

Summer Heat: निसर्गाशी संघर्ष नको, सुसंवाद हवा

Farmer Collective: एकीचा लाभ

Orchard Farming Success: दुष्काळी पट्ट्यात संघर्षातून यशस्वी केल्या फळबागा

Grape Farming Success Story: देश, परदेशातील मार्केटनुसार विविध वाणांची द्राक्षशेती

SCROLL FOR NEXT