One District One Product : अकोल्यात ‘एक जिल्हा एक उत्पादन’मध्ये डाळ, कापूस

Cotton Pulses : राज्याच्या तुलनेत जिल्ह्याची निर्यात अल्प असली तरी ‘एक जिल्हा एक उत्पादन’अंतर्गत डाळ व कापूस या पिकांचा समावेश करून कृषी प्रक्रिया, उत्पादन व निर्यात वाढविण्याचा प्रयत्न उद्योग प्रशासनाकडून केला जात आहे.
Pulses Market
Pulses MarketAgrowon
Published on
Updated on

Akola News : जिल्ह्यातून परदेशात होणाऱ्या निर्यातीत डाळी व कापसाच्या उत्पादनांचा मोठा वाटा आहे. राज्याच्या तुलनेत जिल्ह्याची निर्यात अल्प असली तरी ‘एक जिल्हा एक उत्पादन’अंतर्गत डाळ व कापूस या पिकांचा समावेश करून कृषी प्रक्रिया, उत्पादन व निर्यात वाढविण्याचा प्रयत्न उद्योग प्रशासनाकडून केला जात आहे.

अकोला जिल्ह्यातून गतवर्षी ३०७ कोटी रुपयांची विविध उत्पादने निर्यात करण्यात आली. त्यात मुख्यत्वे डाळी व कापूस उत्पादनांबरोबरच औषधे, सोया मिल, स्टील उत्पादनांचा समावेश आहे. जिल्ह्यातून गतवर्षी चीन, बांगलादेश, श्रीलंका, इथिओपिया, नेपाळ, युनायटेड अरब अमिरात, व्हिएतनाम, युगांडा, केनिया आदी देशांमध्ये विविध उत्पादनांची निर्यात झाली.

Pulses Market
Cotton Production : देशात कापूस उत्पादकता ३२५ लाख गाठींवर राहणार

गतवर्षी अमरावती विभागातून निर्यातीत दोन हजार कोटींहून अधिक उलाढाल झाली. त्यात जिल्ह्याचा वाटा जवळजवळ १४ टक्के आहे. राज्यात जिल्ह्याचा वाटा अल्प आहे. तो वाढविण्यासाठी प्रशासनाकडून कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना, उद्योजकांना नव्या निर्यात संधींबाबत मार्गदर्शन, कार्यशाळा, टपाल विभागातर्फे निर्यात केंद्र आदी कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.

‘एक जिल्हा एक उत्पादन’

जिल्ह्याचे भौगोलिक स्थान, जमीन व वातावरण कापूस व डाळवर्गीय पिकांसाठी अनुकूल आहे. तूर, उडीद, मूग आदींचे उत्पादन घेतले जाते. अकोला, अकोट व मूर्तिजापूर हे डाळ पिकांचे माहेरघर मानले जातात. कृषी उत्पादनात कापूस हे मुख्य पीक आहे. अधिक उत्पादन देणाऱ्या जातींची लागवड जिल्ह्यात प्राधान्याने होते. त्यानंतर डाळीचे उत्पादन घेतले जाते. कापसासाठी अकोला, अकोट व बोरगाव मंजू हे हब मानले जातात.

Pulses Market
Cotton Center : राज्यात कापसासाठी नवी सात केंद्रे

या पिकांनुसार जिल्ह्यात कृषी व अन्नप्रक्रिया उद्योग विस्ताराची शक्यता व संधी आहे. कापसाचे धागे, गाठी, कापड अशा उत्पादनांना मागणी आहे. जिल्ह्यात सुमारे २५ हून अधिक जिनींग- प्रेसिंग उद्योग आणि जवळजवळ ३० डाळ मिल आहेत.

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टपर्यंत (जेएनपीटी) उत्तम रस्ते कनेक्टिव्हिटी, तसेच जिल्ह्यात चार मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. त्यामुळे कापूस व डाळ पिकांचा एक जिल्हा एक उत्पादनअंतर्गत समावेश करण्यात आला आहे. प्रक्रिया उद्योगांना चालना देण्याबरोबरच संभाव्य खरेदीदारांना स्थानिक उत्पादकांशी संपर्क साधण्याची व ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा उपक्रमाचा उद्देश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com