Pune APMC Agrowon
ॲग्रो विशेष

Pune APMC : वारंवार एजन्सी बदलूनही बाजार समितीत वाहतूक व्यवस्थेचा खेळखंडोबा

APMC Update : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरक्षा एजन्सी तुझी की माझी...या हट्टापायी विविध संचालकांच्या बगलबच्चांसाठीची सोय म्हणून विविध विभागांसाठी विविध एजन्सीची खिरापत वाटण्यात आली.

Team Agrowon

Pune News : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरक्षा एजन्सी तुझी की माझी...या हट्टापायी विविध संचालकांच्या बगलबच्चांसाठीची सोय म्हणून विविध विभागांसाठी विविध एजन्सीची खिरापत वाटण्यात आली.

मात्र विविध एजन्सींना काम देऊन सुद्धा वाहतूक कोंडी समस्या दिवसेंदिवस अधिक वाढत चालली आहे. तर सुरक्षारक्षकांनी अतिक्रमण कारवाई, वाहन चालकांवर कारवाई केली तर संचालक सुरक्षा रक्षकांवर दबाव टाकत असल्याने सुरक्षा रक्षक हतबल झाले आहेत. याबाबतचे पत्र सुरक्षा रक्षकांच्या अधिकाऱ्यांनी बाजार समितीला दिले आहे.

बाजार समितीमध्ये आता आंब्याचा हंगाम सुरू होत आहे. रोज आंब्याच्या वाहनांची संख्या वाढत आहे. रविवारी (ता. २३) सकाळी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. सातत्याने होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि शिस्त लावण्यासाठी सुरक्षारक्षक पुरविण्याचा ठेका अवेरिया एंटरप्रायझेस आणि अनिकेत सर्व्हिसेस या ठेकेदारांना दिला होता.

त्यानंतर बीव्हीजीला हा ठेका देण्यात आला. मात्र, परिस्थिती बदलली नाही. आता तर प्रशासनाने शासनाच्या महाराष्ट्र सुरक्षा बलाकडे सुरक्षेची जबाबादारी दिली आहे. मात्र, बाजारात दररोज वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूककोंडी सोडविण्यासाठी कोंडीच्या ठिकाणी प्रत्यक्ष सुरक्षा रक्षक नसतात.

केवळ प्रवेशद्वारावर आणि शारदा गजानन मंदिर येथे सुरक्षा रक्षकांचा घोळका दिसतो. मात्र, बाजारात ठिकठिकाणी नित्य होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या ठिकाणी ती सुरळीत करण्यासाठी सुरक्षारक्षक उपस्थित नसल्याच्या तक्रारी बाजार घटक सातत्याने करत आहेत. मात्र याकडे संचालक मंडळ दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आडते, व्यापारी करत आहेत.

सुरक्षा बलाने प्रशासनावर फोडले खापर

वाहतूक कोंडी सुटत नसल्याबाबतची विविध कारणे देत महाराष्ट्र सुरक्षारक्षक बलाने आपली जबाबदारी झटकली आहे. त्यांनी बाजार समिती प्रशासनावर याचे खापर फोडले आहे. बाजार आवारात बलाकडून कारवाई करण्यात येते. मात्र, कारवाई करत असताना सातत्याने वरिष्ठांचे फोन येतात, आरोप केला आहे. याबाबतचे पत्र देखील त्यांनी बाजार समितीला दिले आहे.

महाराष्ट्र सुरक्षारक्षक बल काम करत नाहीत. प्रवेशद्वारावर सातत्याने ते बसून असतात. कोणाची गाडी आली तरी त्यांच्याकडून कोणतीही चौकशी होत नाही. बाजारात चोऱ्यांचे प्रमाण देखील वाढले आहे. याबाबत सभापती, सचिव आणि संचालक मंडळाच्या निदर्शनास आणून दिलेले आहे. यावर योग्य ती कारवाई होणे अपेक्षित आहे.
- दत्तात्रय पायगुडे, उपसभापती, पुणे बाजार समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT