Pune APMC: संचालक पद वसुलीचे नाही तर सेवेचे : पणनमंत्री रावल

Marketing Minister Jayakumar Rawal: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील संचालक मंडळाच्या निवडणुकीवर मोठ्या खर्चाच्या चर्चांदरम्यान पणनमंत्री जयकुमार रावल यांनी कडक भूमिका घेतली. संचालक पद हे वसुलीसाठी नसून शेतकरी व बाजार समितीच्या हितासाठी काम करण्यासाठी आहे, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
Marketing Minister Jayakumar Rawal
Marketing Minister Jayakumar RawalAgrowon
Published on
Updated on

Pune News: बाजार समित्यांचे संचालक पद हे वसुलीचे नाही तर सेवेचे आहे. संचालक पदावर काम करताना शेतकरी व अन्य बाजार घटकांच्या हितासाठी काम केले पाहिजे, अशा शब्दांत पुणे बाजार समितीच्या संचालकांची कानउघाडणी पणनमंत्री जयकुमार रावल यांनी केली.

पणन मंडळाच्या वतीने सोमवारी (ता. २४) आयोजित बाजार समित्यांच्या राज्यव्यापी परिषदेच्या उद्‌घाटनानंतर मंत्री रावल यांनी पत्रकारांशी संवाद साधला.पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अनेक आडते यांनी संचालक मंडळ नको प्रशासक राजवट चांगली असल्याबाबत पत्रकारांनी रावल यांना प्रश्‍न विचारला.

Marketing Minister Jayakumar Rawal
APMC Reforms : बाजार समित्यांची 'शेतकऱ्यांचे कत्तलखाने' ही ओळख पुसावी ; राज्यव्यापी परिषदेत अपेक्षा व्यक्त

यावर रावल म्हणाले, की लोकशाहीमध्ये लोकनियुक्त संचालक मंडळाला महत्त्व आहे. मात्र बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावरील खर्चाची चर्चा होते. झालेला खर्च बाजार आवारातून वसुल करणे यासाठी ही पदे नसून ही पदे सेवेची आहेत.

Marketing Minister Jayakumar Rawal
APMC Reforms : कृषी बाजार समित्यांच्या कारभारातील सुधारणांसाठी समिती

आपल्या पदाचा उपयोग शेतकऱ्यांच्या शेतीमाल रास्त दर, शेतकऱ्यांना योग्य न्याय, सुविधा मिळण्यासाठी होणे गरजेचे आहे. कोणी अशी वसुली करत असेल तर त्याच्या कारभाराची चौकशी केली जाईल. असेही रावल म्हणाले.

दरम्यान पुणे बाजार समितीच्या वतीने नव्याने उभारण्यात आलेल्या अत्‍याधुनिक फुलबाजाराचे लवकरच उद्‌घाटन होणार आहे. या फुलबाजारात प्रतीक्षा यादी डावलून संचालकांनी काही नावे घुसडली आहे. हा प्रकार चुकीचा असून, प्रतीक्षा यादीत होते त्यांनाच नियमानुसार परवाने मिळायला हवे होते या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असेही रावल यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com