Watermelon Production Agrowon
ॲग्रो विशेष

Watermelon Production : केळीच्या माहेरघरात कलिंगडाचा बोलबाला

Watermelon Cultivation : पणज मंडलात मोडणाऱ्या पणज, रईखेड, अकोली जहाँगीर, बोचरा अशा विविध गावांत केळीची प्रत्येक शेतात लागवड केली जाते आहे.

 गोपाल हागे

Akola News : जिल्ह्यातील अकोट तालुक्यात येणाऱ्या पणज मंडल केळी पिकाच्या उत्पादनात अग्रेसर ओळखले जाते. सिंचनाची सोय असलेला प्रत्येक शेतकरी येथे केळीचे पीक घेत असतो. आता या केळीच्या पट्ट्यात कलिंगड या हंगामी पिकाने घुसखोरी केली असून, शेतकऱ्यांना चांगले दर व उत्पादनही मिळत आहे. सध्या दररोज या भागातून २०० ते ३०० टन माल विविध राज्यांत जात आहे.

पणज मंडलात मोडणाऱ्या पणज, रईखेड, अकोली जहाँगीर, बोचरा अशा विविध गावांत केळीची प्रत्येक शेतात लागवड केली जाते आहे. आता यातील काही शेतकरी केळी सोबत किंवा केळीच्या पिकाशिवाय कलिंगडाच्या हंगामी शेतीकडे वळाले आहेत. या वर्षी या गावांमध्ये सुमारे ४०० ते ५०० एकरांपर्यंत यंदा लागवड झालेली आहे.

या पिकातून १५ दिवसांपासून फळ काढणीचा हंगाम जोराने सुरू झाला. दररोज २०० ते ३०० टनापर्यंत मालाची तोडणी होत आहे. विविध राज्यांतील व्यापारी ही फळे खरेदीसाठी दाखल झालेले आहेत. कलिंगड सध्या १० रुपयांपासून १३ रुपयांपर्यंत विकत आहे. या पिकाच्या माध्यमातून यंदा कोट्यवधीची उलाढाल होणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

या हंगामी शेतीमुळे व्यवस्थापनाच्या अनुषंगाने विविध पूरक व्यवसायांनाही मोठी भरभराट आलेली आहे. सिंचन साहित्य, मल्चिंग, सूक्ष्म अन्नद्रव्ये, कीडनाशके अशा विविध घटकांची विक्री वाढलेली आहे. या भागातील टरबूज सध्या श्रीनगर, जम्मू, कोलकाता, उत्तरप्रदेश, हैदरगड आदी भागात दररोज जात आहे.

अर्थकारण सुधारले

या हंगामी फळपीक शेतीने शेतकऱ्यांना जशी चांगली मिळकत होत आहे, तशा स्वरूपात मजूर, ट्रक वाहतूकदार यांच्यासाठीही रोजगार निर्मिती झाली. फळ तोडणी, ट्रक भरण्यासाठी मजुरांची मागणी वाढलेली आहे.

सर्वत्र मोठी उलाढाल होत आहे. शेतकऱ्यांना या वर्षी दरसुद्धा समाधानकारक मिळत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. इतर पिकांच्या तुलनेत हे हंगामी पीक शेतकऱ्यांसाठी पर्याय म्हणून गेल्या काही वर्षात समोर आलेले आहे. त्यातून अर्थकारण सुधारण्यास अनेकांना मदतही झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Election Results 2024 : पोस्टल मतदानात कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातून पहिला कल हाती

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

SCROLL FOR NEXT