Agriculture Skills Agrowon
ॲग्रो विशेष

Farming Skill School : शेती, पूरक व्यवसाय कौशल्याचे धडे देणारी शाळा

Farming Training : शिक्षक आणि विद्यार्थांच्यासोबत वही, पेन, पुस्तक, खडू, पाटी, फळा म्हणजेच शाळा हे सार्वत्रिक चित्र आपल्या डोळ्यांसमोर येते. परंतु या चाकोरीच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत शेती, बागायती, पूरक व्यवसाय आणि यांत्रिक कौशल्याचे धडे देणारी शाळा म्हणून भडगाव बुद्रुक (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील सह्याद्री माध्यमिक विद्यालय नावरूपास आले आहे.

एकनाथ पवार / ॲग्रोवन वृत्तसेवा

Rural Empowerment : कडावल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने भडगाव बुद्रूक गावात सह्याद्री माध्यमिक विद्यालय कार्यरत आहे. ५ ते १० वी पर्यंतची ११३ पटसंख्या आहे. या शाळेमध्ये शैक्षणिक धोरणानुसार दैनंदिन शिक्षणाचे धडे दिले जातात. तीन वर्षांपूर्वी भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर यांनी या शाळेला भेट दिली. विद्यार्थी दशेमध्ये उद्योगशीलतेचे धडे दिले तर त्यांचा चांगला परिणाम होईल, विद्यार्थ्यांची आवड कशात आहे हे बालवयातच स्पष्ट झाले तर त्यांच्या करिअरची दिशा देखील समजू शकेल अशी संकल्पना त्यांनी संस्था अध्यक्ष, शिक्षक,पालक आणि विद्यार्थ्यांसमोर मांडली.

केवळ संकल्पना मांडून ते थांबले नाहीत तर त्यांनी भगीरथ संस्थेमार्फत सर्वतोपरी सहकार्य दिले. शाळेचे मुख्याध्यापक सचिन धुरी सर्व शिक्षकांच्या साह्याने अतिशय उत्तमपणे ही संकल्पना राबवीत आहे. याशिवाय बांधावरची शाळा, वादन, गायन, यासह कला, क्रिडा क्षेत्रात देखील ही शाळा चमकदार कामगिरी करीत आहे. शाळेच्या परिसरातील पारावर अनेकदा कमी पटसंख्या असलेल्या वर्ग भरतात.

शेतीमधील प्रयोग

शाळेतील दैनंदिन अभ्यासक्रमात कोणताही खंड न पडता उपक्रमास चालना.

पहिल्या वर्षी विद्यार्थ्यांना शेती प्रात्यक्षिक. पीक व्यवस्थापनात मल्चींग पेपर वापराबाबत मार्गदर्शन.

दोडके, काकडी, दुधी, वाल,भोपळा,भेंडी, गवार, मिरची,वांगी, टॉमेटो लागवडीस प्राधान्य.

कंपोस्ट खते,सेंद्रिय खत निर्मितीबाबत प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण.

पहिल्याच वर्षी भाजीपाला लागवडीतून भरघोस उत्पादन. शालेय पोषण आहारात ताज्या भाजीचा वापर. उर्वरित भाजीपाल्याची विद्यार्थ्यांतर्फे गावात विक्री.

८५ विद्यार्थ्यांना परसबागेतील कुक्कुटपालनासाठी भगीरथ प्रतिष्ठानतर्फे चार कोंबड्या आणि एक कोंबड्यांचा गट.

कुक्कुटपालन उत्पन्नातून शिक्षण आणि सहलीचा खर्च.

कौशल्य आधारित शिक्षण

विद्यार्थ्यांना अन्नप्रक्रिया, वेल्डिंग, इलेक्ट्रिक, नळ कारागीर,गवंडी कामाबाबत प्रशिक्षण.

अनुभवी प्रशिक्षक, तज्ञ शेतकरी, शिक्षकांतर्फे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण. विद्यार्थी आता ड्रील मशिन, बेंचवाइस मशिनच्या माध्यमातून टॅपिंग, ड्रीलिंग सहजपणे करतात.

पुणे येथील ‘कॉज टू कनेक्ट’संस्थेतर्फे कौशल्याचे शिक्षणाबाबत मार्गदर्शन.

मला ५० टक्के अनुदानावर चार कोंबड्या आणि एक कोंबडा देण्यात आला होता. मी शिक्षण घेत असताना परसबागेत कुक्कटपालन करतो. यातील उत्पन्नातून शिक्षण आणि सहलीचा खर्च निघतो.
दुर्वेश सुतार, विद्यार्थी, सचिन धुरी, मुख्याध्यापक,सह्याद्री माध्यमिक विद्यालय, भडगाव बुद्रूक ९४०५७९७२२०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Sowing : रब्बी हंगामात ३ लाख ३९ हजार हेक्टरवर पेरणी प्रस्तावित

Agriculture Mortgage Loan : ‘शेतीमाल तारण’साठी औसा बाजार समितीचे पहिले पाऊल

Unseasonal Rain : अवकाळी पावसाने शेतकरी मेटाकुटीला

8th Pay Commission: ५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, आठवा वेतन आयोग 'या' दिवशी लागू होणार

Rabi Sowing : लातूर विभागात पंधरा लाख हेक्टवर रब्बीचा पेरा

SCROLL FOR NEXT