
Vangaon News : वाणगाव : शेतकरी रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात करीत असल्यामुळे पिकांवर त्याचा दुष्परिणाम होत असून, जमिनीमध्ये त्याचा परिणाम होऊ लागला आहे. पर्यायाने शेतकरी, पाणी, प्राणी, पक्षी, मानवी आरोग्य आणि गांडूळ मित्रांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे रासायनिक खतांऐवजी शेतीला वरदान असणारी सेंद्रिय खते बनवण्याची पद्धत शेतकऱ्यांनी जोपासली पाहिजे.
डहाणू तालुक्यातील वाणगाव-आसनगावमधील कृषी तंत्र विद्यालय, आसनगाव येथील कृषीच्या विद्यार्थ्यांनी गांडूळ खत प्रकल्प उभारून भविष्यात रोजगारनिर्मितीचे साधन निर्माण केले आहे. भविष्यात शेती टिकवायची असेल तर गांडूळ खत, शेणखताचा वापर अनिवार्य आहे.
घरगुती पदार्थांचा वापर
पिकांचे अवशेष, जनावरांपासून मिळणारी उपउत्पादिते, हिरवळीच्या खतांची पिके, घरातील केरकचरा, भाज्यांचे अवशेष, फळांच्या साली, शिळे अन्न व झाडांचा पालापाचोळा, घरातील सांडपाणी इत्यादी सेंद्रिय पदार्थ वापरून गांडूळ खतनिर्मिती करणे शक्य झाले आहे.
गांडूळ खत वापरण्याचे फायदे
मातीचा सामू सातपर्यंत आणण्यास गांडूळ मदत करते.
संतुलित वनस्पती अन्नद्रव्यांची अधिकाधिक उपलब्धता होते. मातीची पाणी निचरा होण्याची व शोषण क्षमता बळकट होते.
मातीमध्ये अधिक प्रमाणात प्राणवायू व जैविक घटकांची क्रिया निरंतर चालू राहते.
रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचे आरोग्य धोक्यात येत आहे. त्यामुळे सेंद्रिय खतांचा वापर करून शेतीपूरक व्यवसायामध्ये यशस्वी होण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
- मोनिका ठाकरे, माजी विद्यार्थिनी
गांडूळ खत तयार करण्याच्या पद्धतीमध्ये कृत्रिम सावलीची गरज असते. निवारा शेडच्या दोन्ही बाजू उताराच्या दिशेने असाव्यात. छपरासाठी गवत, भाताचा पेंडा, नारळाची झावळे, तुरीच्या काड्या, ज्वारीची ताटे, जाड प्लॅस्टिकचा कागद किंवा सिमेंट अथवा लोखंडी पत्र्याचा उपयोग करावा.
- प्रवीण भोये, प्राध्यापक, कृषी तंत्र विद्यालय, आसनगाव
पिकवत असलेल्या भाजीपाल्यात, फळ बागेत गांडूळ खताचा वापर करावा.
- सोनालिका पाटील, प्राचार्य
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.