ZP Kolhapur agrowon
ॲग्रो विशेष

ZP Kolhapur : लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या निधीतच अपहार

Jhilha Parishad Kolhapur : जिल्हा परिषदेत प्रोटोकॉलशिवाय कोणतीही फाईल पुढे सरकत नाही. कोणताही विभाग याला अपवाद नाही, असे म्हणायला हरकत नाही.

sandeep Shirguppe

Kolhapur Jhilha Parishad : कोल्हापूर जिल्ह्यातील लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारालाही प्रोटोकॉल किंवा अपहाराची कीड लागली आहे. संबंधित विभागातील अधिकाऱ्याने कोणाची मंजुरी नाही, कोणाचा शेरा नाही, तरीही परस्पर निधी वैयक्तिक खात्यावर वर्ग केल्याची माहिती आहे.

स्वयंपाक व मदतनीस यांच्या मानधन निधीतील २३ लाखांचा अपहार केल्याचे मान्य कर, म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील लेखाधिकाऱ्यांना मारहाण झाली आणि हे प्रकरण चव्हाट्यावर आले. यामधील दोषी सर्वच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे.

जिल्हा परिषदेत प्रोटोकॉलशिवाय कोणतीही फाईल पुढे सरकत नाही. कोणताही विभाग याला अपवाद नाही, असे म्हणायला हरकत नाही.

दरम्यान, शालेय पोषण आहारामध्ये संबंधित महिलेने शालेय पोषण आहाराचा जो निधी आहे. तो बचत गटांच्या खात्यावर पाठविण्याऐवजी स्वतःच्या खात्यावर पाठविल्याची माहिती आहे. शालेय पोषण आहाराच्या निधी अथवा बिल पास करण्याचा प्रस्ताव क्लार्क, वित्त अधिकारी यांनी तपासल्यानंतर आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी मान्यता दिल्यानंतर निधी बचत गटांच्या खात्यावर पाठविला जातो.

संबंधित निधी कोणाच्या खात्यावर पाठविला जातो. त्याची तपासणी करण्याची जबाबदारी या सर्व अधिकाऱ्यांची आहे. अशी सर्व प्रक्रिया असताना शालेय पोषण आहाराचा निधी अचानकपणे कर्मचाऱ्याच्या खासगी खात्यावर जातोच कसा, असा प्रश्न आहे.

मग, निधी बँक खात्यावर पाठविणे अथवा बिल पास करण्याचे अधिकार संबंधित महिला कर्मचाऱ्याला अधिकाऱ्यांनी दिले होते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अधिकाऱ्यांच्या याबाबतच्या निष्काळजीपणाबद्दल त्यांच्यावर आणि बिल पास करण्याच्या प्रक्रियेतील सर्वांवर कारवाई होणे आवश्यक आहे. या प्रकरणाची मुंबईतील वित्त विभागाकडे तक्रार झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: अपात्र लाडक्या बहिणींनी लाटले ५१०० कोटी रुपये; सरकार कारवाई करणार

Livestock Vaccination : सोलापूर जिल्ह्यातील साडेसहा हजार जनावरांना लाळया खुरकूत लस

Khandesh Water Storage : खानदेशातील प्रमुख प्रकल्पांत जलसंचय वाढला

Nashik Rain : मालेगाव तालुक्यात पावसाचा जोर

Banana Cultivation : पावसामुळे केळी लागवड रखडली

SCROLL FOR NEXT