Chandrashekhar Bawankule On Crop Loan Relief: खरीप २०२६ मधील पर्जन्यमानातील तूट व अन्य घटकांच्या आधारे राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळाचा ‘ट्रिगर-१’ लागू करण्यात आला आहे. या तालुक्यांमध्ये पंचनामे व पीक परिस्थितीचे सर्वेक्षण तातडीने सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, कर्जवसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या वीजबिलात सवलत, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी तसेच पाणी, चारा व रोजगाराच्या आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. पीक नुकसानीबाबतची मदत स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे जाहीर करण्यात येईल. दुष्काळाच्या संकटात शेतकरी आणि नागरिकांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली..Maharashtra Drought Relief: दुष्काळाचा पहिला ट्रीगर २६५ तालुक्यांत लागू, दुष्काळी सवलती मिळणार; पंचनाम्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश.राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळाचे सावट आहे. सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण मदतीची भूमिका जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१७ आणि २०२८ मध्ये राज्याला दुष्काळाच्या परिस्थितीतून बाहेर काढले होते. आताच्या परिस्थितीवरही शासन निर्णय घेतला असून, दुष्काळासाठीच्या उपाययोजना केल्या जातील, असे महसूलमंत्र्यांनी नमूद केले..Maharashtra Drought: राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळाचा पहिला ट्रिगर लागू, शेतकऱ्यांना मदत, सवलती मिळणार- कृषिमंत्री भरणे.चारा छावण्या सुरु करण्याचा निर्णयआता पीक कर्जाचे पुनर्गठण होईल. कृषी पंपांच्या वीज बिलात सूट मिळेल. रोजगार हमी योजनेच्या कामाच्या निकषांत बदल, चारा छावण्या सुरु करण्याचाही निर्णय घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या थांबल्या होत्या; त्या पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यामध्ये जलसंधारणाच्या कामावर अधिक भर दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले. <iframe .राज्यातील शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज मिळाले पाहिजे. हा प्राथमिक शासन निर्णय आहे. अजून काही जिल्ह्यांमध्ये भौगोलिक परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतील, असेही महसूलमंत्री बावनकुळेंनी स्पष्ट केले. २०२६ च्या खरीप हंगामातील ट्रिगर-१ (प्रथम कळ) लागू झालेल्या २६५ तालुक्यांमध्ये विविध उपाययोजना व सवलती लागू करण्याबाबतचा शासन निर्णय मदत व पुनर्वसन विभागाने जारी केला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.