Shiv Sangram leader Jyoti Mete : ज्योती मेटेंची लोकसभा निवडणूक रिंगणातून माघार; पत्रकार परिषदे घेत जाहीर केला निर्णय 

Beed Lok Sabha elections : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बीड मतदारसंघात पंकजा मुंडे यांच्या विरोधात शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे राण उठवतील अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र आता या चर्चांना पुर्णविराम लागला असून ज्योती मेटे यांनी माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 
Shiv Sangram leader Jyoti Mete : ज्योती मेटेंची लोकसभा निवडणूक रिंगणातून माघार; पत्रकार परिषदे घेत जाहीर केला निर्णय 

Pune News : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बीडमध्ये सध्या जोरदार शक्तिप्रदर्शन सुरू आहे. येथे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याविरोधात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बजरंग सोनवणे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. याचदरम्यान शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे यांनी देखील निवडणूक लढण्यासाठी इच्छुक व्यक्त केल्याने मतदारसंघात चूरस निर्माण झाली होती. मात्र आता पंकजा मुंडे यांच्यासमोरील मोठे वादळ शांत झाले असून ज्योती मेटे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. याबाबत ज्योती मेटे यांनी शनिवारी (ता.२०) पत्रकार परिषद घेत निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट केलं. 

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बीडमध्ये पंकजा मुंडे यांची नाराजी दूर करताना भाजपने थेट त्यांना लोकसभेचे तिकीट दिले. यामुळे बीडमधून पारंपरिक विरोधक असणाऱ्या कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात असलेला दुरावा कमी झाला आहे. तर धनंजय मुंडे हे पंकजा मुंडे यांच्या प्रचाराला लागले आहेत. यादरम्यान ज्योती मेटे यांनी लोकसभा निवडणुकीतून दंड थापाटताना अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले होते. यावरून बीडसह राज्यात बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. 

Shiv Sangram leader Jyoti Mete : ज्योती मेटेंची लोकसभा निवडणूक रिंगणातून माघार; पत्रकार परिषदे घेत जाहीर केला निर्णय 
Vinayak Mete : स्व. विनायक मेटेंच्या चळवळीला बळ देणार

मात्र आता ज्योती मेटे यांनी निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट करताना, 'समजाचे व्यापक हित लक्षात घेऊन निवडणुकीतून माघार घेत', असल्याचे म्हटले आहे. तसेच 'शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून लवकरच प्रदेश पातळीवर निर्णय घेण्यात येईल', असेही ज्योती मेटे यांनी म्हटले आहे. 

ज्योती मेटे म्हणाल्या, 'मी लोकसभा निवडणूक लढवावी अशी बीडच्या जनतेची मागणी होती. मात्र उमेदवारी न मिळाल्यामुळे दुसऱ्या मार्गांचा विचार न करता जन मताची चाचपणी केली. समाजासाठी माझं कुंकू मी गमावलं. पण आता गमावण्यासारखं काहीच उरलेलं नाही. जन मताची चाचपणी आणि लोकमताचा विचार केला आहे. यामुळे समजाचे व्यापक हित लक्षात घेऊन लोकसभा निवडणूक लढवणार नाही', असे ज्योती मेटे म्हणाल्या. ज्योती मेटे यांच्या लोकसभा निवडणूक रिंगणातून माघारीमुळे बीडमध्ये राजकारणातील नफ्या-तोट्यांच्या चर्चांना उधान आले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com