Tukaram Mote Agrowon
ॲग्रो विशेष

Soil Health : जमिनीचे आरोग्य जपल्याशिवाय उत्पादन खर्चात बचत शक्य नाही

Tukaram Mote : जमिनीचे आरोग्य जपल्याशिवाय उत्पादन खर्चात बचत शक्य नाही, असे मत विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे यांनी व्यक्त केले.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : शेतीतील प्रयोगशीलतेत सातत्य महत्त्वाचे आहे. सेंद्रिय शेतीमालाला दर मिळत नाही असे म्हणण्यापेक्षा सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये उत्पादन खर्च वाचतो, हे लक्षात घ्या. जमिनीचे आरोग्य जपल्याशिवाय उत्पादन खर्चात बचत शक्य नाही, असे मत विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे यांनी व्यक्त केले.

पैठण रोडवरील कृषी विज्ञान केंद्रात सोमवारी (ता. ४) पौष्टिक तृणधान्य कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवावेळी अध्यक्ष म्हणून डॉ. मोटे बोलत होते. या महोत्सवात कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. किशोर झाडे, सेवानिवृत्त कृषी अधिकारी डी. एस. कुलकर्णी यांनी पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. मोटे म्हणाले, पौष्टिक धान्यांचे आपल्या आरोग्यात विशेष महत्त्व आहे. शून्य मशागत नैसर्गिक शेती करताना रेसीड्यु फ्री शेतमाल उत्पादनावर भर द्यावा लागेल.

या महोत्सवात शासनाकडून जाहीर करण्यात आलेले कृषी विभागाचे विविध पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील कृषिभूषण पुरस्कार प्राप्त भरत आहेर, दीपक चव्हाण, बालचंद्र घुणावत, डॉ. सीताराम जाधव, गोरखनाथ गोरे, उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त बाबासाहेब पडूळ,

युवा शेतकरी लक्ष्मण आहेर, हरी ठोंबरे, यज्ञेश कातबने, शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त दादासाहेब शिंदे, दत्तू धोतरे, अनिल शेळके, कृषिसेवा पुरस्कार प्राप्त रत्न संजय साठे पाटील, पाणी फाउंडेशन आयोजित वॉटर कप स्पर्धा राज्यस्तरीय पुरस्कार विजेते यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तुरीचे विक्रमी उत्पादन घेणारे ज्ञानप्रकाश मोदानी, प्रवीण मोदानी तसेच ॲग्रोवनचे जिल्हा प्रतिनिधी संतोष मुंढे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पी. आर. देशमुख यांनी तर सूत्रसंचालन संजीव साठे पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे आभार कृषी विभागाचे श्री. जेधे यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT