Soil Health : रासायनिक घटकांमुळे जमिनीचे आरोग्य धोक्यात

Organic Farming : सेंद्रिय शेती काळाची गरज असून, अशा पद्धतीने उत्पादन घेतल्यास विषमुक्त अन्नधान्य, फळपिके व भाजीपाला ग्राहकांना उपलब्ध होईल. g :
Soil Health
Soil HealthAgrowon

Pune News : ‘‘सेंद्रिय शेती काळाची गरज असून, अशा पद्धतीने उत्पादन घेतल्यास विषमुक्त अन्नधान्य, फळपिके व भाजीपाला ग्राहकांना उपलब्ध होईल. तसेच अनियंत्रित रासायनिक कीटकनाशके, रासायनिक खते व तणनाशकांच्या वापरामुळे जमिनीचे आरोग्य धोक्यात आले आहे.

त्यामुळे भूगर्भातील पाणी दूषित झालेले आहे. मानवी आरोग्यास हानी पोहचत असून कॅन्सरसारख्या आजारांमुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे,’’ असे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सेंद्रीय शेती प्रकल्पाचे प्रमुख विद्यावेत्ता डॉ. उल्हास सुर्वे यांनी व्यक्त केले.

कृषी विभाग, आत्मा व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘किसान गोष्टी’ कार्यक्रम नुकताच मातोबाची आळंदी येथे घेण्यात आला. त्यावेळी श्री. सुर्वे बोलत होते. या वेळी तालुका कृषी अधिकारी मारुती साळे, मृदा शास्त्रज्ञ डॉ. आदिनाथ ताटके, कृषी विद्यावेत्ता डॉ. सुनील उगले, मंडळ कृषी अधिकारी गुलाब कडलग, शिवाजी खंडेराव जवळकर, विलास जवळकर, गणेश कुंजीर, विजय जवळकर, कैलास भोंडवे, बाळासाहेब भोंडवे, लक्ष्मण खटाटे उपस्थित होते.

Soil Health
Soil Health : मृद्‍ आरोग्यासाठी उच्च दर्जाचे संशोधन हवे

श्री सुर्वे म्हणाले, की उच्च रक्तदाब, मधुमेह, महिलांचे आरोग्य, लहान मुलांचे आरोग्य व ज्येष्ठ नागरिकांच्या शारीरिक व्याधींच्या समस्या निर्माण होण्याचे प्रमुख कारण म्हणजे दूषित हवामान, दूषित पाणी, अनियंत्रित निविष्ठांचा पीक उत्पादनातील वापर हे आहे. त्यामुळे सेंद्रिय शेती करणे आवश्यक आहे.

सेंद्रिय शेती पद्धतीने शेती केल्यास जमिनीमधील कर्बाचे प्रमाण वाढेल. उपयुक्त जिवाणूंच्या संख्येत वाढ होईल व उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढून पीक उत्पादनात भरीव वाढ होईल. विषमुक्त अन्नधान्य उपलब्ध होईल. तसेच सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण केल्यास कृषिमाल निर्यातीस चालना मिळेल. शेतमालाला योग्य हमी भाव मिळण्याची शाश्वती निर्माण होईल.’’

Soil Health
Soil Health : मृदेच्या आरोग्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा वापर आवश्यक

मृदा शास्त्रज्ञ डॉ. आदिनाथ ताटके म्हणाले, की कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार रासायनिक खतांचा अवलंब करून त्याला सेंद्रिय शेतीची जोड दिली तर पिकांचे शाश्वत असे कांदा पिकाचे उत्पादन मिळेल.

कांदा पिकास मिश्र खते देताना युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट व म्युरेट ऑफ पोटॅशमधूनच खतांची मात्रा दिल्यास उत्पादन खर्चात बचत होईल. तसेच कांदा रोपे लागवड करताना कांदा रोपांची मुळे जैविक कीटकनाशकांचा व बुरशीनाशकामध्ये बुडविल्यास कांदा पिकास जमिनीतील होणारे कीडरोग नियंत्रण होण्यास मदत होईल.’’ या कार्यक्रमात रेश्मा शिंदे यांनी प्रास्ताविक केले. तंटामुक्त अभियानाचे अध्यक्ष लक्ष्मण भोंडवे यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com