ISO Rating of the Satara District Co-Operative Bank Agrowon
ॲग्रो विशेष

Satara District Bank : सातारा जिल्हा बँकेला ‘आयएसओ’ मानांकन

ISO Rating of the Satara District Co-Operative Bank : जागतिक स्तरावरील ग्राहक सेवा व कामकाज व्यवस्थापनाचा उत्कृष्ट मापदंड निश्चित केल्याने येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आयएसओ मानांकन मिळाले.

Team Agrowon

Satara News : जागतिक स्तरावरील ग्राहक सेवा व कामकाज व्यवस्थापनाचा उत्कृष्ट मापदंड निश्चित केल्याने येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आयएसओ मानांकन मिळाले. या आंतरराष्ट्रीय कंपनीचे सेल्स व मार्केटिंगचे डायरेक्टर रत्नदीप कोतुले व पुणे शाखेचे प्रमुख शैलेश साठे यांनी नुकतेच बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांना सर्टिफिकेशन प्रदान केले.

या वेळी बँकेचे संचालक माजी आमदार प्रभाकर घार्गे, दत्तात्रय ढमाळ, राजेंद्र राजपुरे, प्रदीप विधाते, शिवरूपराजे खर्डेकर, सुनील खत्री, रामराव लेंभे, सुरेश सावंत, लहुराज जाधव, संचालिका कांचन साळुंखे, ऋतुजा पाटील, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे, उपव्यवस्थापक जयवंत पवार उपस्थित होते.

या वेळी नितीन पाटील म्हणाले, ‘‘बँकेने सेवेचे जाळे ग्रामीण भागातील तळागाळातील घटकांपर्यंत पोचविले असून, ग्राहकांना आधुनिक बँकिंग सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या असून, बँकेच्या उत्कृष्ट कामकाजामुळेच बँकेस नाबार्ड तसेच राष्ट्रीय व राज्य पातळीवरील अनेक पुरस्कारांनी गौरविले असून, लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये ‘सहकार क्षेत्रातील सर्वोच्च बँक’ म्हणून बँकेची नोंद झालेली आहे.

डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, ‘‘बँकेच्या स्थापनेला ७४ वर्षे पूर्ण झालेली असून, बँकेने देदीप्यमान अशी प्रगती केलेली आहे. बँक सतत ‘अ’ ऑडिट वर्ग, सतत नफ्यात, ठेवी व कर्जवाढीमध्ये सातत्याने वाढ, सतत १६ वर्षे नेट एनपीए शून्य टक्के, उत्कृष्ट वसुली, सामाजिक बांधिलकी, तसेच आरबीआय/नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करीत असून, बँकेचा नावलौकिक देशभर आहे.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

Banana Export : करमाळ्यातून केळीचा पहिला कंटेनर रशियाला रवाना

SCROLL FOR NEXT