Buldana News: घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्ह्यात आंदोलने करण्यात आली. चिखली येथे जिल्हा काँग्रेसच्या पुढाकाराने झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले..मोदी सरकारने गॅस सिलेंडरच्या दरात अचानक वाढ करून सर्वसामान्यांवर महागाईचा मोठा बोजा टाकला असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. एकीकडे महिलांना ‘लाडकी बहीण म्हणायचे आणि दुसरीकडे महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच दरवाढ लादायची, हा सरकारचा दुटप्पीपणा असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली..LPG Cylinder Booking: गॅस सिलिंडर बुकिंगच्या नियमांमध्ये बदल; डिलिव्हरीमधील अंतर २१ दिवस.काँग्रेसच्या काळात सुमारे ४०० रुपयांना मिळणारा गॅस सिलिंडर आज हजारो रुपयांपर्यंत पोहोचला असल्याचे सांगत या दरवाढीमुळे घर चालविणाऱ्या महिलांचे बजेट कोलमडले असून सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित बिघडल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले..LPG Supply EC Act: 'एलपीजी'चा तुटवडा, साठेबाजी रोखण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय, 'एस्मा' लागू.दरवाढीचा निषेध नोंदवीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात चिखली तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. महिलांनी चुलीवर स्वयंपाक करून केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात संताप व्यक्त केला. तसेच प्रतीकात्मक स्वरूपात गॅस सिलिंडरची अंत्ययात्रा काढून निषेध नोंदविण्यात आला..तहसीलदारांना घेराव घालत केंद्र सरकारने गॅस सिलिंडरची दरवाढ तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. महागाईच्या झळा सहन करणाऱ्या सर्वसामान्य जनतेसाठी काँग्रेस पक्षाचा संघर्ष पुढेही सुरू राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला. याप्रसंगी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामभाऊ जाधव यांच्यासह महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.