Pune News: राज्यातील काही भागात आज ढगाळ हवामान होते. तर बहुतांशी ठिकाणी उन्हाचा चटका चांगलाच वाढलेला आहे. राज्यात पुढील ५ दिवस काही ठिकाणी हलक्या आणि वादळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. .राज्यात आज काही भागात उष्णतेची लाट तर काही भागात पावसाचे वातावरण पाहायला मिळाले. आज नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा अंदाज देण्यात आला..Maharashtra Weather: मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाची शक्यता.तर यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला, रायगड, मुंबई, ठामे आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. उद्याही अकोला आणि अमरावती जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्याता आलेल आहे. .Maharashtra Unseasonal Rain: राज्यात कोकण वगळता वादळी पावसाचा इशारा.उद्यापासून राज्यातील आणखी काही भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. अहिल्यानगर, पुणे, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया आणि यवतमाळ जिल्ह्यात पुढील ४ दिवस काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. .वर्धा, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यात बुधवारी तसेच कोल्हापूर आणि भंडारा जिल्ह्यात मंगळवारी आणि बुधवारी काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. सिंधुदूर्ग, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात सोमवारी काही भागात ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.