State Cooperative Bank : राज्य सहकारी बँकेतून आता शासकीय बँकिंग व्यवहार

Government Banking : राज्य सहकारी बँकेला अधिक सक्षम करणे तसेच ग्रामीण पतपुरवठ्यात वाढ करणे आवश्यक असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे या वेळी सांगण्यात आले.
Maharashtra cooperative bank
Maharashtra cooperative bankAgrowon
Published on
Updated on

बाळासाहेब पाटील

Mumbai News : शासकीय कार्यालयांचे बँकिंग विषयक व्यवहार आणि सार्वजनिक उपक्रम महामंडळांकडील निधी गुंतविण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेस पात्र ठरविण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत गुरुवारी (ता.१९) घेण्यात आला.

राज्य सहकारी बँकेला अधिक सक्षम करणे तसेच ग्रामीण पतपुरवठ्यात वाढ करणे आवश्यक असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे या वेळी सांगण्यात आले.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra cooperative bank
State Cooperative Bank : राज्य सहकारी बँक सभेत दहा टक्के लाभांशास मान्यता

राष्ट्रीयीकृत बँकांसोबतच १६ हजार कोटी किंवा अधिक मूल्य, त्याचप्रमाणे खासगी बँकांनी सतत ५ वर्षे निव्वळ नफा मिळविणे, भांडवल प्रर्याप्तता गुणोत्तर १२ टक्क्यांपेक्षा जास्त असणे, बँकेवर रिझर्व्ह बँकेकडून कोणतेही आर्थिक निर्बंध, त्वरित सुधारात्मक कार्यवाही लादलेली नसणे या निकषांची पूर्तता करण्याच्या अटींवर बॅंकेस पात्र ठरविण्याचा निर्णय झाला.

Maharashtra cooperative bank
State Cooperative Bank : राज्य बँकेच्या कर्जासाठीही नकोय वैयक्तिक हमी

राज्य सहकारी बँकेचे नक्त मूल्य ४ हजार कोटींपेक्षा जास्त असून सतत ५ वर्षे ही बॅंक नफ्यात राहिलेली आहे. लेखापरिक्षणात देखील सतत ५ वर्षे ‘अ’ वर्ग दर्जा असून भांडवल प्रर्याप्तता गुणोत्तर १२ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

पुढील काळात वेळोवेळी नक्त मूल्याची किमान मर्यादा वाढविण्याची कार्यवाही वित्त विभागांकडून करण्यात येईल. तसेच दरवर्षी आढावा घेऊन या निकषावर संबंधित बँकांची नावे समाविष्ट करून किंवा वगळून बँकांची यादी अद्ययावत करण्यात येईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com