Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : सणसरमध्ये ९५ मिलिमीटर पावसाची नोंद

Rain News : मंगळवारी (ता.२०) सकाळी आठ वाजेपर्यंत इंदापूर तालुक्यातील सणसरमध्ये ९५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे या भागातील भूजल पातळीत वाढ होऊ लागली आहे.

Team Agrowon

Pune News : जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. दुष्काळी समजल्या जाणाऱ्या पूर्व पट्ट्यातील पुरंदर, बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. मंगळवारी (ता.२०) सकाळी आठ वाजेपर्यंत इंदापूर तालुक्यातील सणसरमध्ये ९५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे या भागातील भूजल पातळीत वाढ होऊ लागली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पूर्व भागात पावसाचा जोर कमी होता. मागील दोन ते तीन दिवसांपासून या भागात दुपारनंतर पाऊस होत आहे. त्यामुळे खरिपातील तूर, कापूस, बाजरी अशा पिकांना दिलासा मिळत असून पिकेही तरारली आहेत.

सध्या पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असल्याने ओढे, नाले भरून वाहत असून शेतातही पाणी साठ असल्याने काढणीच्या अवस्थेत असलेल्या मूग, सोयाबीन, उडीद पिकांचे काही प्रमाणात नुकसान होत आहे.

शिरूरमधील रांजणगाव येथे ३९ मिलिमीटर पाऊस पडला. न्हावरा येथे ३० मिलिमीटर, तर वडगाव, मलठण, तळेगाव, कोरेगाव, पाबळ, शिरूर येथे हलका पाऊस पडला. बारामतीतील बारामती येथे २६ मिलिमीटर, तर उंडवडी २३, माळेगाव २२, पणदरे १९ मिलिमीटर पाऊस झाला असून वडगाव, लोणी, सुपा, मोरगाव येथे तुरळक सरी पडल्या.

इंदापुरातील भिगवण येथे २५ मिलिलिटर, तर इंदापूर ७५, लोणी १४, बावडा ६०, काटी २७, निमगाव ४०, अंथुर्णी येथे ३६ मिलिमीटर, दौंडमधील रावणगाव येथे ५२ मिलिमीटर, तर बोरी भदक ३८, पारगाव येथे ३० मिलिमीटर, तर दौंड, देऊळगाव, पाटस, यवत, कडेगाव, राहू, वरवंड, खामगाव, वडगाव बांदे, बोरी पार्धी येथे तुरळक सरी पडल्या.

पुरंदरमधील कुंभारवळण येथे २५ मिलिमीटर, तर सासवड, भिवंडी, जेजुरी, परिंचे, राजेवाडी, वाल्हा येथे हलका पाऊस झाला. हवेलीतील खेड शिवापूर येथे ६२ मिलिमीटर, तर उरुळीकांचन ४५, वाघोली २७, थेऊर येथे २५ मिलिमीटर पाऊस पडला असून पुणे वेधशाळा, केशवनगर, खडकवासला, चिंचवड, कळस, अष्टापूर येथे हलका, मुळशीतील मुठे येथे २८ मिलिमीटर, तर पौड, घोटावडे, थेरगाव, माले, पिरंगुट येथे तुरळक, भोरमधील वेळू येथे ६२ मिलिमीटर, तर भोर ५१, नसरापूर, किकवी ३७ मिलिमीटर, तर आंबवडे, संगमनेर, भोलावडे, निगुडघर येथे हलका, मावळातील तळेगाव, काले, कार्ला, खडकाळा, लोणावळा, शिवणे येथे तुरळक सरी पडल्या.

वेल्ह्यातील आंबवणे येथे ३३ मिलिमीटर, वेल्हा २८, विंझर येथे २६ मिलिमीटर, जुन्नरमधील आपटाळे येथे ३९ मिलिमीटर, ओतूर येथे ३० मिलिमीटर, तर जुन्नर, नारायणगाव, वडगाव आनंद, निमगाव सावा, बेल्हा, राजूर, डिंगोरे येथे तुरळक सरी पडल्या. खेडमधील कन्हेरसर येथे ३६ मिलिमीटर, पिंपळगाव येथे ३४ मिलिमीटर, तर वाडा, राजगुरुनगर, कुडे, पाईट, चाकण, आळंदी, कडुस येथे हलका, आंबेगावमधील घोडेगाव, आंबेगाव, कळंब, पारगाव, मंचर येथे हलका पाऊस झाला. त्यामुळे खरिपातील पिकांना चांगलेच जीवदान मिळाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT