Sanjay Kulkarni Agrowon
ॲग्रो विशेष

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Sanjay Kulkarni : राज्यातील सिंचन प्रकल्पांच्या विकासात भरीव योगदान देणारे अभियंता संजय कुलकर्णी (६२ वर्षे) यांचे दीर्घ आजारामुळे निधन झाले.

Team Agrowon

Pune News : राज्यातील सिंचन प्रकल्पांच्या विकासात भरीव योगदान देणारे अभियंता संजय कुलकर्णी (६२ वर्षे) यांचे दीर्घ आजारामुळे निधन झाले. तापी खोरे पाटबंधारे मंडळाच्या कार्यकारी संचालकपदावरून चार वर्षांपूर्वी निवृत्त झालेले संजय कुलकर्णी यांचे जन्मगाव मावळातील तळेगाव दाभाडे असले तरी ते फलटणचे रहिवासी होते. १३ ऑक्टोबरला त्यांचे निधन झाल्यानंतर जलसंपदा विभागावर पसरलेली शोककळा अद्यापही गेलेली नाही.

शुक्रवारी (ता.२५) पुण्याच्या सिंचन भवनात आयोजित केलेल्या शोकसभेला राज्यातील नामवंत जलतज्ज्ञांनी हजेरी लावली. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदा सचिव संजय बेलसरे यांचे शोकसंदेश या वेळी वाचण्यात आले.

अविनाश सुर्वे, व्ही. एम. कुलकर्णी, हि. ता. मेंढेगिरी, व्यंकटराव गायकवाड अशा चारही माजी जलसंपदा सचिवांसह कृष्णाखोरे पाटबंधारे मंडळाच्या कार्यकारी संचालक अ. अ. कपोले, मुख्य अभियंता हेमंत धुमाळ, कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव, प्रशांत आडे व इतर वरिष्ठ अभियंते उपस्थित होते.

कुलकर्णी यांच्या तांत्रिक व प्रशासकीय कामाचा आवाका इतका अफाट होता, की राज्याच्या जलसंपदा धोरणावर त्यांची छाप पडलेली होती. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक तांत्रिक अनेक शोधनिबंध सादर केलेल्या कुलकर्णी यांनी राज्यातील महापूर स्थिती नियंत्रण, नदी जोड, जलविद्युत प्रकल्प उभारणी, बंधारा उभारणी तंत्र अशा कामांमध्ये योगदान दिले. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे ते सदस्य होते.

कोयना धरणाच्या बहुचर्चित लेक टॅपिंग घटनेत त्यांनीच मोलाची भूमिका बजावली होती. पानशेत, वरसगाव, चासकमान, घाटघर, धोम बलकवडी, काटेपूर्णा अशा अनेक धरण प्रकल्पांच्या उपयुक्ततेला विविध उपक्रमांमधून त्यांनी गती दिली. विशेष म्हणजे कृष्णा पाणी तंटा न्यायाधिकरणात कुलकर्णी यांनी राज्याच्या वतीने महत्त्वाची भूमिका बजावली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Spice Industry : चटणी, मसाला उद्योगातून समृद्धी

Agriculture Development : कृषी क्षेत्रामध्ये झांबियाची वाढतेय गुंतवणूक

Weekly Weather : ईशान्य मॉन्सून महाराष्ट्राबाहेर मार्गस्थ

Global Development Trust : ग्लोबल विकास ट्रस्टच्या कृषिकूलचे उद्घाटन

Agriculture University Promotion : कृषी विद्यापीठातील पदोन्नतीचे आदेश न काढणे कायदेशीर : आनंदकर

SCROLL FOR NEXT