Sericulture Agrowon
ॲग्रो विशेष

Sericulture : सांगलीत रेशीम शेतीसाठी ७०० एकरांचा लक्ष्यांक

Mulberry Cultivation : जिल्हा रेशीम कार्यालयातर्फे तुती लागवडीद्वारे रेशीम कोष उत्पादन योजना राबविण्यात येत आहे.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यात महारेशीम अभियान सुरू झाले आहे. रेशीम संचालनालया‌द्वारे जिल्ह्यातील रेशीम उद्योग वाढीसाठी रेशीम विभागास २०० एकर, कृषी विभागास ३०० एकर व जिल्हा परिषदेस २०० एकर असे मिळून एकूण ७०० एकरचा लक्ष्यांक देण्यात आला आहे.

हे अभियान ९ फेब्रुवारीपर्यंत आहे, अशी माहिती रेशीम विभागाच्या सूत्रांनी दिली. जिल्ह्यात रेशीम शेती उ‌द्योगासाठी खूप वाव आहे. त्यामुळे जिल्हा रेशीम विकास कार्यालयामार्फत तुती लागवडीला चालना मिळावी, यासाठी महारेशीम अभियान राबविण्यात येत आहे.

यासाठी शेतकऱ्यांनी ९ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत रेशीम विभाग, कृषी आणि जिल्हा परिषदेकडे नाव नोंदणीचे आवाहन केले आहे. रेशीम संचालनालया‌द्वारे जिल्ह्यातील उद्योग वाढीसाठी रेशीम विभागास २०० एकर, कृषी विभागास ३०० एकर व जिल्हा परिषदेस २०० एकर असे मिळून ७०० एकरचा लक्ष्यांक दिला आहे.

जिल्हा रेशीम कार्यालयातर्फे तुती लागवडीद्वारे रेशीम कोष उत्पादन योजना राबविण्यात येत आहे. यात लाभार्थी निवडताना, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जमाती, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे, महिला प्रधान कुटुंबे, शारीरिक अपंगत्व प्रधान कुटुंबे, भुसुधार योजनेचे लाभार्थी, कृषी कर्ज माफी योजनेनुसार अल्प भुधारक सीमांत शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. माहितीसाठी जिल्हा रेशीम कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी राजेश कांबळे व सुनील पाटील यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Organic Farming Business: सेंद्रिय शेती उद्योगातील तेल्हारा कंपनी

Digital Infrastructure: ‘डेटा सेंटर’ची मेख

Maharashtra Politics: नेमिची येते अधिवेशन

Land Dispute Resolution: बारामतीत अपर जिल्हाधिकारी कार्यालयाला मान्यता

Fertilizer Booking Limit: छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यांत बेसुमार खत खरेदीला आळा

SCROLL FOR NEXT