
Chh. Sambhajinagar News : केंद्रीय रेशीम उत्पादन संशोधन व प्रशिक्षण संस्थेने २०३० पर्यंत ३० हजार टन तुती रेशीम कोषाचे उत्पादन करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. या संस्थेच्या संशोधनाचा लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा व्हावा यासाठी महाराष्ट्रात २ रेशीम उत्पादन संसाधन केंद्रास केंद्रीय रेशीम उत्पादन संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे ३ वर्षासाठी मान्यता देण्यात आली. त्यापैकी एक केंद्र एमजीएम कृषी विज्ञान केंद्र, गांधेली येथे मंजूर झाले आहे. त्यासंबंधीचा सामंजस्य करारही नुकताच झाला आहे.
केंद्रीय रेशीम बोर्डाचे उष्णकटीबंधातील ६ राज्यातील संशोधन व प्रशिक्षणासाठी म्हैसूर येथे केंद्रीय रेशीम उत्पादन संशोधन व प्रशिक्षण संस्था १९६१ पासून कार्यरत आहे. मंजूर संसाधन केंद्राचा उद्देश दरवर्षी १० प्रशिक्षण वर्गाद्वारे २०० शेतकऱ्यांना प्रशिक्षित करणे आहे. तसेच शेतकऱ्यांना एकाच छताखाली सर्व प्रकारचे तांत्रिक मार्गदर्शन छत्रपती संभाजीनगर येथील केंद्रीय रेशीम बोर्डाचे संशोधन व विस्तार केंद्र यांच्या सहकार्याने उपलब्ध होणार आहे.
रेशीम उत्पादन संसाधन केंद्र सुरु करण्यासाठी केंद्रीय रेशीम उत्पादन संशोधन व प्रशिक्षण संस्था, म्हैसूर व एमजीएम कृषी विज्ञान केंद्र, गांधेली यांच्यात सामंजस्य करार शुक्रवारी (ता. २७) मैसूर येथे झाला. या प्रसंगी केंद्रीय रेशीम उत्पादन संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे संचालक डॉ. गांधी दास, छत्रपती संभाजीनगर येथील संशोधन विस्तार केंद्राचे शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.अंकुश गाडगे, प्रशिक्षण विभाग प्रमुख डॉ. रेवप्पा, डॉ. श्रीमती तमील सेल्वी, डॉ. तन्मय सरकार, एम. जी. एम. कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख काकासाहेब सुकासे यांची उपस्थिती होती.
हे केंद्र मंजूर होण्यासाठी छत्रपती संभाजीनगरचे रेशीम विकास अधिकारी बी. डी. डेंगळे, केंद्रीय रेशीम बोर्ड संशोधन विस्तार केंद्र शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. अंकुश गाडगे यांचे सहकार्य लाभले. यासोबतच रेशीम उत्पादन संशोधन केंद्र सुरू करण्यासाठी महात्मा गांधी मिशनचे सचिव अंकुशराव कदम, एमजीएम हिल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रवीण सूर्यवंशी व संचालक डॉ. के. ए. धापके यांचे मार्गदर्शन लाभले.
कृषी विज्ञान केंद्राचे कार्य...
कृषी विज्ञान केंद्र, गांधेली ११ वर्षापासून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी प्रयत्नशील आहे. या केंद्रामार्फत या वर्षी विशेष कापूस प्रकल्पांतर्गत १७५ शेतकऱ्यांच्या शेतावर घन, सघन व दादा लाड तंत्रज्ञानाने प्रात्येक्षिके घेण्यात आली. तसेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत सोयाबीनचे २०० एकर व तुरीचे २५० एकरावर प्रात्येक्षिके घेण्यात आली. या प्रात्यक्षिकांमुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढ होण्यास मदत होत आहे.
या कृषी विज्ञान केंद्रात यशदा, पुणे यांच्यामार्फत सरपंचासाठी प्रशिक्षण आयोजित केले जाते. या केंद्राच्या जैविक कीडनियंत्रण प्रयोगशाळेत चांगल्या प्रतीचे ट्रायकोडर्मा, मेटारायझीयम, जैविक संघ तसेच निम तेल, मोसंबी स्पेशल सुक्ष्मअन्नद्रव्य व फळांचे दर्जेदार रोपे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत.
या कृषी विज्ञान केंद्रामध्ये २०१३ पासून रेशीम कीटक संगोपन केले जाते. सद्या रेशीम कीटक संगोपनासाठी २ रेशीम कीटक संगोपन गृह व ६ एकर क्षेत्रावर तुती लागवड तसेच एमजीएम संस्थेचे गांधेली प्रक्षेत्रावर रेशीम धागा निर्मिती केंद्र सुरु असल्याची माहिती कृषी विज्ञान केंद्राकडून देण्यात आली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.