Water Shortage  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : सांगली, सातारा जिल्ह्याला पाणी कपातीचा फटका

Water Shortage : सांगली आणि सातारा या दोनही जिल्ह्यांना वर्षभरात सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी ४० टीएमसी इतके पाणी मिळते.

Abhijeet Dake

Sangli News : ः सांगली आणि सातारा या दोनही जिल्ह्यांना वर्षभरात सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी ४० टीएमसी इतके पाणी मिळते. मात्र, कोयना धरणात पाणीसाठा कमी असल्याने पाणी वाटपाच्या नियोजनाचा अहवाल राज्य शासनाकडे सादर केला आहे. त्यामुळे सांगली आणि सातारा या दोनही जिल्ह्यांना मिळणाऱ्या पाण्याला १० टक्के म्हणजे पाच टीएमसी कपात होणार आहे.

अर्थात ३५ टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. परिणामी दोनही जिल्ह्यांतील खासगी व सहकारी उपसा सिंचन योजनांसह टेंभू, ताकारी आणि आरफळ योजनांच्या पाणी उपसावर निर्बंध येणार आहे.

या वर्षी पावसाने दडी मारली आहे. परिणामी कोयना धरण शंभर टक्के भरले नाही. कोयना धरण या वर्षी धरण ९१ टीएमसीपर्यंत भरले होते. सध्याचा साठा ८९ टीएमसी आहे. म्हणजेच, ३१ ऑक्टोबरला १०५ टीएमसी साठा अपेक्षित असताना तो तब्बल १६ टीएमसी कमी आहे.

यासाऱ्या परिणाम पाणी वाटपावर होणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पाणी कपातीचे संकट ओढावले असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात कृष्णा नदी ऐन पावसाळ्यात कोरडी पडली आहे. त्यामुळे कृष्णा नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे

सांगली आणि सातारा या दोनही जिल्ह्यांत कोयनेतून वर्षभरात ४० टीएमसी पाणी सिंचन आणि पिण्यासाठी मिळते. परंतू यंदा धरणात पाण्याचा साठा कमी असल्याने १० टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. टेंभू, ताकारी आणि आरफळ योजनांसह खासगी आणि सहकारी उपसा सिंचन योजना आणि पिण्याच्या पाण्यासाठी ३५ टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे.

सांगली जिल्ह्यात २५० तर सातारा जिल्ह्यात २२५ खासगी आणि सहकारी पाणी उपसा सिंचन योजना आहेत. परंतु सध्या कृष्णा नदीत पाण्याची पातळी कमी असल्याने या दोनही जिल्ह्यातील ५० टक्के उपसा सिंचन योजना बंद आहेत. पाणी कपातीच्या धोरणामुळे या योजनांना देखील पाणी उपसा करण्यासाठी निर्बंध लागण्याची शक्यता आहे. परिणामी पिकांना वेळेत पाणी कसे उपलब्ध होणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

पाणी वाटपाचे नियोजन करणार

पाण्याची तूट असल्याने सिंचन योजनांचे आवर्तन आणि पाणी वाटप कसे होणार याबाबत अद्यापही नियोजन केले नाही. परंतू दोन दिवसांत कालवा सल्लागार समितीची बैठक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबैठकीत पाणी वाटपाचे नियोजन केले जाणार आहे. त्यानुसार आवर्तनाचे नियोजन पाटबंधारे विभागाच्या स्तरावर केले जाणार असल्याची माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

अकरा टीएमसी असणार तूट

प्राथमिक माहितीनुसार, जून आणि जुलै २०२४ साठी १६.४० टीएमसी साठा राखीव ठेवला आहे. उर्वरित ७० टीएमसी पाण्यातून ३५ टीएमसी पाणी हे पूर्वेकडील सिंचन योजनांसाठी दिले जाईल तर ३५ टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी वापरले जाईल. या वर्षी पावसाळ्यात सुमारे ५ टीएमसी पाणी सिंचनासाठी वापरले असून २३ टीएमसी पाण्याचा वीज निर्मितीसाठी वापर केला आहे. त्यानुसार आता एकूण तूट ही सुमारे ११ टीएमसी असणार आहे.

‘म्हैसाळ’ला चिंता नाही

म्हैसाळ उपसा सिंचन योजना ही चांदोली धरणावर अवलंबून आहे. म्हैसाळ योजनेसाठी ८.९६ टीएमसी पाणी राखीव आहे. हरिपूर संगमापासून खाली शेती योजनांसाठी ३ टीएमसी पाणी राखीव आहे. चांदोलीत ३४ टीएमसी साठा आहे.

कोयना धरणातून वीज निर्मितीला लागणाऱ्या पाण्याची कपात करुन हे पाणी सिंचन आणि पिण्यासाठी द्यावे. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्याशी पाणी सोडण्याबाबात चर्चा केली परंतू त्यांनी पाणी सोडण्यासाठी नकार दिला आहे. त्यामुळे आम्ही आंदोलन करणार आहे.
- जे. पी. लाड, अध्यक्ष, सांगली जिल्हा इरिगेशन फेडरेशन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

Sangli Vidhansabha Election : सांगलीत भाजपचं मायक्रो प्लॅनिंग; आर. आर. आबांच्या मुलाने वादळात दिवा लावला

Lumpy Skin Disease : दिघंचीमध्ये ‘लम्पी’चा विळखा

Agrowon Podcast : कांदा बाजारभाव दबावात; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत गहू दर?

SCROLL FOR NEXT