Water Crisis : मराठवाड्यातील ३६ लघू-मध्यम प्रकल्प कोरडे

Marathwada Water Issue : मराठवाड्यातील ३६ लघू मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत. त्यामध्ये ३५ लघू प्रकल्पांसह एका मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे.
Water Shortage
Water Shortage Agrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील ३६ लघू मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत. त्यामध्ये ३५ लघू प्रकल्पांसह एका मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे. दुसरीकडे २६८ लघू-मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे.

यंदा मराठवाड्यावर दुष्काळाचे ढग गडद झाले आहेत. मोठ्या प्रकल्पांपैकी जायकवाडीची स्थितीही बरी नाही. जायकवाडीमध्ये केवळ ४७ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

दुसरीकडे माजलगाव प्रकल्पात केवळ ११ टक्के, निम्न दुधना प्रकल्पात २७ टक्के, निम्न तेरणा २३ टक्के, मांजरा २९ टक्के अशी मोठ्या प्रकल्पांपैकी काही प्रकल्प चिंतनीय अवस्थेत आहे.

परतीच्या पावसाचीही अपेक्षित कृपा न झाल्याने प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली नाही. त्यामुळे जायकवाडी सारख्या मोठ्या प्रकल्पाची तहान आता जायकवाडीच्या वरच्या भागातील प्रकल्पांमधून पाणी सोडण्यावर अवलंबून आहे.

Water Shortage
Water Crisis : जळगावात विविध भागांत पाणीपातळी घटली

आजमितीला मोठ्या अकरा प्रकल्पात ५३ टक्के, मध्यम ७५ प्रकल्पात ३१ टक्के, लघू ७४९ प्रकल्पात केवळ ३५ टक्के तर गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यात ४९ टक्के तसेच तेरणा,मांजरा, रेणा नदीवरील २७ बंधाऱ्यात ७४ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

Water Shortage
Solapur Water Crisis : पाण्यासाठी आजी-माजी आमदार आक्रमक

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पात २७ टक्के, जालन्यामधील सात प्रकल्पात २१ टक्के, बीडमधील सोळा प्रकल्पात ४२ टक्के, लातूरमधील आठ प्रकल्पात २८ टक्के, उस्मानाबादमधील १७ प्रकल्पात १४ टक्के, नांदेडमधील ९ प्रकल्पात ६१ टक्के तर परभणीतील दोन मध्यम प्रकल्पात २५ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

दुसरीकडे ७४९ लघू प्रकल्पांपैकी छत्रपती संभाजीनगरमधील ९८ प्रकल्पातील ५९ टक्के, जालन्यातील ५७ प्रकल्पात केवळ ८ टक्के, बीडमधील १२६ प्रकल्पात २६ टक्के, लातूरमधील १३४ प्रकल्पात ३० टक्के, धाराशिवमधील २०६ प्रकल्पात १७ टक्के, नांदेडमधील ८० प्रकल्पात ९७ टक्के, परभणीतील २२ प्रकल्पात १४ टक्के तर हिंगोलीतील २७ प्रकल्पात ८० टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com