Amravati News : सरासरीपेक्षा २५ टक्के कमी झालेल्या पावसाचा फटका यंदा जिल्ह्यातील साडेपाचशे गावांना बसणार आहे. विशेष म्हणजे, टँकरच्या संख्येतसुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून आतापासून पाणीटंचाई आराखडा तयार करण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे.
गतवर्षी पाणीटंचाईची तीव्रता फारशी नव्हती. केवळ २०० गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यातील बहुतांश गावे मेळघाटातील होती. मागील वर्षी मे व जून महिन्यात ११ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता, मात्र यंदाची परिस्थिती अतिशय भीषण असल्याचे दिसून येते. यंदा आतापर्यंत सरासरी ४६ टक्केच पाऊस पडला आहे.
('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
त्यामुळे नद्या व धरणांमध्ये किमान जलसाठा आहे. शिवाय भूजलस्तरात देखील घट झाली आहे. परिणामी यंदा ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाईचे संकेत आहेत. मागील वर्षीपेक्षा यंदा जवळपास दुप्पट गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता असून टँकरच्या संख्येतसुद्धा वाढ होणार आहे.
आता वर्षभराचा आराखडा
आतापर्यंत तीन टप्प्यांत पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात येत होता. टंचाईची तीव्रता पाहून उपाययोजना सुरू केल्या जात होत्या. त्यानुसार ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत पहिला टप्पा, जानेवारी ते मार्च दुसरा व एप्रिल ते जून तिसरा, अशा तीन टप्प्यांत आराखड्याची विभागणी केली जात होती. मात्र यावर्षीपासून एकाच टप्प्यात वर्षभराचा आराखडा तयार करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. तसे पत्रसुद्धा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला प्राप्त झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.