Heavy Rainfall  Agrowon
ॲग्रो विशेष

Sangli Rainfall : सांगली जिल्ह्यात जून महिन्यात ११९ टक्के पावसाची नोंद

Monsoon Rain : गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या जून महिन्यात ७७ मिलिमीटरने पाऊस कमी झाला आहे.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यात गतवर्षीच्या जून महिन्यात दमदार पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला होता. यंदाही जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. जून महिन्यात १४८ मिलिमीटर म्हणजे ११९ टक्के इतक्या पावसाची नोंद झाली आहे. गत वर्षीच्या जूनमध्ये २२५ मिलिमीटर इतका पाऊस झाला होता.

गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या जून महिन्यात ७७ मिलिमीटरने पाऊस कमी झाला आहे. जत, आटपाडी, खानापूर आणि कवठेमहांकाळ तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात पाऊस कमी झाला असला तरी, खरिपासाठी हा पाऊस उपयुक्त असल्याने बळीराजा सुखावला आहे.

जिल्ह्यात गतवर्षी वेळेत पाऊस सुरु झाला होता. जून महिन्यात सर्वच तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली. शिराळा तालुक्यात २४२ मिलिमीटर इतका पाऊस झाला होता. जत, खानापूर, तासगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ या तालुक्यात जून महिन्यात सरासरी पेक्षा कमी अधिक पाऊस होतो. परंतु गतवर्षी या पाचही तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला.

यंदाही वेळेत पावसाने हजेरी लावली. जून महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात सर्वदूर पाऊस झाला. शिराळा तालुक्यात ४२३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गतवर्षीच्या तुनलेत यंदाच्या जूनमध्ये शिराळा तालुक्यात १८१ मिलिमीटर जादा पावसाची नोंद झाली आहे.

तर जत, आटपाडी, खानापूर आणि कवठेमहांकाळ या चार तालुक्यांत पावसाने जवळपास सरासरी गाठली असल्याचे चित्र आहे. जिल्ह्याची जून महिन्याची सरासरी १२९ मिलिमीटर इतकी आहे. यंदाच्या जून महिन्यात कमी अधिक पाऊस झाला असला तरी सरासरीपेक्षा १९ मिलिमीटर अधिक पावसाची नोंद झाली आहे.

मे मध्ये २३८ मिमी नोंद

जिल्ह्याची मे महिन्याची पावसाची सरासरी ४८.६ इतकी आहे. गतवर्षी मे महिन्यात ६६.७ मिलिमीटर इतका पाऊस झाला होता. यंदा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सर्वदूर पावसाने हजेरी लावली. दुष्काळी पट्ट्यातील कवेठमहांकाळ, आटपाडी, तासगाव, विटा आणि जत या तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. मे महिन्यात २३८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गतवर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत यंदा मे महिन्यात १८९.४ मिलिमीटरने अधिक पाऊस झाला आहे.

तालुकानिहाय तुलनात्मक पाऊस दृष्टिक्षेप ( मिमी)

तालुका जून

२०२५ जून

२०२४

मिरज १०८.७ २१३.१

जत ८२.८ २१५.६

खानापूर-विटा ८८.२ १९९.३

वाळवा-इस्लामपूर १९४.८ २४७.२

तासगाव १०३.० २४२.६

शिराळा ४२३.६ २४२.५

आटपाडी ८२.९ १९८.१

कवठेमहांकाळ ८३.३ २५६.२

पलूस १६३.७ १९४.२

कडेगाव १३६.५ २१७.०

एकूण १४८.२ २२५.८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Injustice: शेतकरी नावडे सर्वांना

Illegal Agri Inputs: अवैधतेचे गुजरात मॉडेल

Vidarbha Irrigation Project: विदर्भातील १३ सिंचन प्रकल्प रद्द

Land Acquisition Law: भूसंपादन कायद्यातील बदलाबाबत सरकार गंभीर

BG II Cotton: ‘वनामकृवि’ कडून कपाशीचे सरळ वाण बीजी II मध्ये परिवर्तित

SCROLL FOR NEXT