Sangli Lok Sabha agrowon
ॲग्रो विशेष

Sangli Lok Sabha : सांगलीत नो मशाल, ओन्ली विशाल, अपक्ष विशाल पाटील यांचा विजय

Vishal Patil : सांगलीतून लिफाफाच्या माध्यमातून दिल्लीत आपणच जाणार असल्याचे संदेश दिला.

sandeep Shirguppe

Lok Sabha Election Sangli : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी अपक्ष राहत आपला विजय खेचून आणला आहे. भाजपचे संजयकाका पाटील आणि महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील यांना धूळ चारत दादा घराण्याचे सांगली जिल्ह्यावर वचर्स्व असल्याचे सिद्ध केलं आहे.

विशाल पाटील यांनी टपाली मतदानापासून विशाल यांनी आघाडी घेतली होती. त्यांनी शेवटपर्यंत आघाडी कायम ठेवत सांगलीतून लिफाफाच्या माध्यमातून दिल्लीत आपणच जाणार असल्याचे संदेश दिला.

महाराष्ट्रात जागावाटपाबाबत सर्वाधिक चर्चेत सांगली मतदार संघ राहिला होता. महाविकास आघाडीकडून राज्यभरात जागावाटपाबाबत समन्वय ठेवण्यात आला परंतु सांगलीच्या जागेबाबत जोरदार काँग्रेस आणि ठाकरे गटात जोरदार रस्सीखेच रंगली होती.

सांगली जिल्ह्यात कुठेही शिवसेनेची ताकद नसताना ठाकरे गटाकडेच उमेदवारी राहिल असा हट्ट धरला होता. काँग्रेसला विश्वासात न घेता ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यावेळीपासूनच नो मशाल आता फक्त विशाल असाच नारा सांगलीतून देण्यात आला होता.

सांगली लोकसभेसाठी यंदा जवळपास ६१ टक्के मतदान झालं होते. त्यामध्ये खरी लढत ही अपक्ष विशाल पाटील आणि भाजपचे संजयकाका पाटील यांच्यात झाली. विविध एक्झिट पोलमध्येही विशाल पाटील हेच आघाडीवर असल्याचं सांगितलं गेलं. जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी चंद्रहार पाटलांना मदत न करता अपक्ष असलेल्या विशाल पाटलांना मदत केल्याचं उघड झालं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Warehouse Receipt: पूर्व युरोप, मध्य आशिया खंडातील गोदाम पावती वित्तपुरवठा

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

Fake Agri Inputs: निविष्ठांवर सरकारचे नियंत्रण किती?

Whatsapp Chatbot: महसूल विभागाच्या सेवांसाठी देणार ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’

Eknath Shinde: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नाही

SCROLL FOR NEXT