Soybean Germination Complaints Issue: सोयाबीन बियाणे उगविले नसल्याच्या नऊ जिल्ह्यांतील २९८ तक्रारी आणि ५५ पैकी १० नमुने अप्रमाणित आढळल्याने मध्य प्रदेशातील मे. एसकेबी सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा बियाणे विक्री परवाना कृषी विभागाने रद्द केला आहे. कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) सुनील बोरकर यांनी मंगळवारी (ता. १५) याबाबत आदेश दिले..खरीप हंगाम २०२६मध्ये कंपनीने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत सोयाबीन बियाण्याचा पुरवठा केला होता. कंपनीने साथी पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार ५ हजार ७१० क्विंटल सत्यतादर्शक बियाण्याचा पुरवठा करण्यात आला. या बियाण्याची पेरणी केल्यानंतर उगवण न झाल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या. त्यानंतर क्षेत्रीय पातळीवर गुणनियंत्रण निरीक्षकांनी कंपनीच्या विविध वाणांचे ५५ नमुने घेतले. त्यापैकी १० नमुने अप्रमाणित आढळले..Seed Law Reform: बनावट बियाण्यांवर नियंत्रणासाठी बीज कायद्यात बदलाची गरज: कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान.या प्रकरणी कंपनीला १७ ऑगस्ट रोजी सुनावणीची नोटीस देण्यात आली. कंपनीचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर १ सप्टेंबर रोजी प्रथम सुनावणी झाली. कंपनीने म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागितल्यानंतर ११ सप्टेंबर रोजी अंतिम सुनावणी घेण्यात आली. सुनावणीदरम्यान कंपनीने परवान्यात समाविष्ट नसलेल्या वाणाचे नाव बियाण्याच्या लेबलवर छापल्याचे निदर्शनास आले. .Fake Soybean Seeds: बोगस निविष्ठा उत्पादकांवर कारवाई करा.त्यामुळे बियाणे कायदा १९६६ मधील खंड ७ (अ), (ब), (क) तसेच बियाणे नियम १९६८ मधील नियम १० चा भंग झाल्याचे नमूद करण्यात आले. तसेच सत्यतादर्शक बियाण्याच्या उत्पादन व विक्रीसंदर्भातील आवश्यक माहिती, प्रक्रिया आणि नोंदी ठेवणे अपेक्षित असताना संबंधित वाणाबाबत ही प्रक्रिया राबविल्याचे आवश्यक पुरावे कंपनीला सादर करता आले नाहीत..बियाणे उगवण, गुणवत्तेबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारींची कृषी विभागाकडून गांभीर्याने दखल घेतली जात आहे. संबधित कंपनीकडे बियाणे नसताना विक्री केल्याचे आढळल्याने परवाना रद्द केला आहे. इतरही कंपन्यांची तपासणी सुरू असून दोष आढळलेल्या कंपन्यांविरोधात नियमाप्रमाणे कार्यवाही केली जाईल.सुनील बोरकर, कृषी संचालक, निविष्ठा व गुणनियंत्रण, पुणे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.