Sugarcane Crushing Season 2026: राज्यातील २०२६-२७च्या ऊस गाळप हंगामासाठी आतापर्यंत १२७ साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी साखर आयुक्तालयाकडे ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये ६६ सहकारी आणि ६१ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. दरम्यान, राज्यातील गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास मंत्रिसमितीने नुकतीच मान्यता दिली आहे..साखर आयुक्तालयाच्या माहितीनुसार, सर्वाधिक अर्ज कोल्हापूर आणि सोलापूर विभागांतून प्रत्येकी २४, अहिल्यानगर विभागातून २२ आणि पुणे विभागातून २१ दाखल झाले आहेत. नांदेड विभागातून १८, छत्रपती संभाजीनगर विभागातून १६, अमरावती विभागातून एक आणि नागपूर विभागातून एक अर्ज दाखल झाला आहे..Sugar Industry : कारखान्यांकडून होणार उसाची पळवापळवी.अहिल्यानगर विभागातील २२ अर्जांमध्ये १२ सहकारी आणि १० खासगी कारखान्यांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील १६ अर्जांमध्ये आठ सहकारी आणि आठ खासगी कारखाने आहेत. इतर विभागांतील अर्जांची वर्गवारी आयुक्तालयाच्या नोंदीनुसार करण्यात आली आहे..यंदाच्या हंगामासाठी राज्यात सुमारे १५.४८ लाख हेक्टर क्षेत्रावरील ऊस गाळपासाठी उपलब्ध असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र अपुरा पाऊस आणि काही भागांतील पाणीटंचाईमुळे प्रत्यक्ष ऊस उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऊस उपलब्धतेचा फेरआढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेषतः मराठवाड्यातील काही भागांत पाण्याअभावी ऊस पिकावर परिणाम होत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे..Sugarcane Crushing Permit: ऊस गाळप परवान्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत.पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर आणि सोलापूर विभागांत ऊस क्षेत्र व साखर कारखान्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे यंदाच्या गाळप हंगामातही या विभागांचे महत्त्व कायम राहण्याची शक्यता आहे. मागील हंगामात पुणे आणि सोलापूर विभागांनी ऊस गाळपात आघाडी घेतली होती. कोल्हापूर विभागाची साखर उतारा आणि उत्पादनातील कामगिरीही चांगली राहिली होती. गाळप परवान्याची प्रक्रिया सुरू असून, काही कारखान्यांचे अर्ज प्रादेशिक सहसंचालकांकडे प्रलंबित आहेत. अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि पुणे विभागांतील काही अर्जांची छाननी सुरू असल्याचे आयुक्तालयाच्या नोंदीत नमूद आहे..विभागनिहाय गाळप परवाना अर्जअहिल्यानगर : २२ (१२ सहकारी, १० खासगी)अमरावती : १ (१ खासगी)छत्रपती संभाजीनगर : १६ (८ सहकारी, ८ खासगी)कोल्हापूर : २४ (१८ सहकारी, ६ खासगी)नागपूर : १ (१ खासगी)नांदेड : १८ (६ सहकारी, १२ खासगी)पुणे : २१ (१३ सहकारी, ८ खासगी)सोलापूर : २४ (९ सहकारी, १५ खासगी)एकूण : १२७ (६६ सहकारी, ६१ खासगी).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.