Sangli Kolhapur Farmers agrowon
ॲग्रो विशेष

Sangli Kolhapur Farmers : : सांगली -कोल्हापूर रस्ता भूसंपादनावरून शेतकरी आक्रमक, खासदार मानेंवर प्रश्नांची सरबत्ती

Sangli Kolhapur Road : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील अंकली पूल ते कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील अनेक गावातून हा रस्ता जाणार आहे.

sandeep Shirguppe

MP Darhysheel Mane : रत्नागिरीपासून ते नागपूर असा राष्ट्रीय महामार्ग होत आहे दरम्यान या रस्त्यासाठी हजारो हेक्टर शेतकऱ्यांची जमीन यातून नष्ट होणार आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील अंकली पूल ते कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील अनेक गावातून हा रस्ता जाणार आहे. परंतु या शेतकऱ्यांना जमीन हस्तातरणाचे रेडिरेकनरच्या फक्त २ पटीनेच पैस मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी याला विरोध केला आहे.

खासदार धैर्यशील माने, प्राधिकरण विभागाचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर, भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी विवेक काळे उदगाव येथे चोकाक ते उदगावदरम्यान होणाऱ्या महामार्गाच्या कामकाजाबाबात नागरिकांच्या समस्यांचे निराकरण व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आढावा बैठक घेतली.

यामध्ये उदगाव येथे असलेल्या बायपास मार्गावरून बदल प्रस्ताव तयार करून प्राधिकरण विभागाकडून मंजूर करून घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला परंतु जोपर्यंत शासन निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितलं.

रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्ग अशा अंकली उदगाव ते जैनापूरपर्यंत नव्याने जमिनी हस्तांतर होणार आहेत. त्याऐवजी जुन्या सांगली-कोल्हापूर बायपास मागनिच राष्ट्रीय मार्ग करा. शिवाय नव्या मार्गाच्या भरावामुळे उमळवाड, कोथळी परिसरातील गावे महापुरात पाण्याखाली जाणार आहेत. त्यामुळे जुन्या मागनिच नवा मार्ग करावा, अशी मागणी उदगाव, उमळवाड, कोथळी परिसरांतील शेतकऱ्यांनी केली.

महामार्गामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी उदगाव येथील सहा अभियंत्यांनी जुन्या बायपास मार्गावरून कसा मार्ग होऊ शकतो, तो केल्यास पुराचा धोका टळतो, शेतकऱ्यांचे नुकसान टाळता येते, याची माहिती ले-आऊटमधून दिली.

शेतकरी अरुण मगदूम, सुदर्शन मगदूम, दीपक नकाते, रामचंद्र बंडगर, सन्मती मगदूम, दादासाहेब कोळी, राजेंद्र मगदूम आदींनी उदगावमध्ये सांगली-कोल्हापूर मार्गासाठी आता तिसऱ्यांदा जमीन जाणार असल्याचे सांगितले. त्यामुळे होणारा मार्ग बायपास मागनिच करावा, अन्यथा महामार्गाचे काम होऊ देणार नसल्याचे सांगितले.

खासदार धैर्यशील माने यांनी प्रकल्प संचालक यांना तयार केलेल्या नकाशा रचनेत बदल करण्यासाठी तत्काळ वरिष्ठांना या बाबी सांगून नव्याने उदगाव भागात होणाऱ्या मार्गाची नव्याने मंजुरी घ्यावी, यासाठी मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ही बाब पटवून देऊन त्यांच्याकडूनही याची मंजुरी मिळवून देणार असल्याचे सांगितले. नायब तहसीलदार योगेश जमदाडे, युवासेना जिल्हाप्रमुख राकेश खोंद्रे, भैरू हंकारे, रमेश मगदूम, पोलिस पाटील अनुराधा कांबळे, दिलीप कांबळे, अविनाश चौगुले आदी उपस्थित होते.

चौपट दराची मागणी

जैनापूर येथील बेघर, १२९ व ४९६ गट क्रमांक, शेत व सर्व्हिस रोड, तसेच होणाऱ्या मार्गाची माहिती प्राधिकरण विभागाने शेतकऱ्यांना द्यावी. अन्यथा रस्ता होऊ देणार नाही. तसेच आम्हाला चौपट दर दिला पाहिजे, यांसह अनेक मागण्या मांडल्या. राष्ट्रीय महामार्ग अन्याय निवारण कृती समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील, सरपंच संगीता कांबळे, सन्मती पाटील आदी उपस्थित होते.

गायरानातून मार्ग न्या

तमदलगेला जादा गायरान असून, बागायत शेती कमी आहे. होणारा मार्ग गायरान जमिनीतून न्या. त्यामुळे गाव वाचेल, शेतीचे नुकसान होणार नसल्याचे सांगितले. ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन होत नाही तोपर्यंत पुढील काम थांबवा, असे आदेश खासदार धैर्यशील माने यांनी दिले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख राकेश खोंद्रे, सुधाकर खोंद्रे, राजकुमार आडमुडे, राजगोंडा पाटील, अमोल कोळी, अभिजित वझे, सरपंच धनाजी नंदिवाले, तसेच उपसरपंच पुरुषोत्तम शिरसट उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT