Ajit Pawar Kolhapur : अजित पवारांनी गोकुळचे कौतुक केले अन् गोकुळ अध्यक्षांनी शरद पवारांचे, नेमकं काय घडलं?

Ajit Pawar vs Sharad Pawar : अजित पवार आणि शरद पवार हे कित्येकवेळा समोर आले परंतु यांच्यामधील असलेला दुरावा सर्वश्रूत झाला.
Ajit Pawar Kolhapur
Ajit Pawar Kolhapuragrowon
Published on
Updated on

Gokul Milk : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार काल(ता.२९) कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. दरम्यान यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी कोल्हापुरातील विविध विकासकामांचे उद्घाटन केले. तसेच कोल्हापूर जिल्हा दूध संघ गोकुळलाही भेट देत गोकुळच्या कामाचे कौतुकही केले.

दरम्यान यावेळी गोकुळचे अध्यक्ष अरूण डोंगळे यांनी अजित पवारांसमोर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गोकुळला केलेल्या सहकार्याबद्दल माहिती देत कौतुक केले. यामुळे अजित पवारांसमोर शरद पवारांचे कौतुक केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या.

मागच्या काही महिन्यांपूर्वी अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये दुफळी निर्माण झाल्याने राष्ट्रवादीचा एक गट सत्तेत सामील झाला. यानंतर अजित पवार आणि शरद पवार हे कित्येकवेळा समोर आले परंतु यांच्यामधील असलेला दुरावा सर्वश्रूत झाला. अजित पवार यांनी कित्येक वेळा आपल्या भाषणात अप्रत्यक्षरित्या शरद पवार यांच्यावर टीकाही केल्या आहेत. अशातच गोकुळचे अध्यक्ष अरूण डोंगळे यांनी शरद पवार यांचे अजित पवारांसमोर कौतुक केले. यावेळी गोकुळ दूध संघाच्या प्रांगणात पार पडलेल्या या सोहळ्याला दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कुजबूज सुरू होती.

'गोकुळ'चे अध्यक्ष अरुण डोंगळे म्हणाले, 'गुणवत्तेमुळे गोकुळ राज्यात प्रसिद्ध झाला आहे. मुंबई बाजारपेठेमुळे गोकुळला चांगले दिवस आले. यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. आज गोकुळ राज्यात ब्रँड करण्यात अनेकांचे योगदान असल्याचे डोंगळे म्हणाले. तसेच गोकुळ सध्या एक - रुपयामधील ८२ पैसे शेतकऱ्यांना देत आहेत. मुंबईमध्ये 'गोकुळ-शक्ती' म्हणून गाय दूध विक्री सुरू केली जाणार असल्याचीही माहिती अरूण डोंगळे यांनी दिली. तसेच एक फेब्रुवारीपासून हे दूध विक्री केले जाणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी गोकुळचा हीरक महोत्सवी वर्षामध्ये, अद्ययावत लोणी व पेढा निर्मिती प्रकल्पाचा शिलान्यास, पेट्रोल पंप भूमिपूजन, गोकुळ श्री पुरस्कार वितरण तसेच हिरक महोत्सवी वर्षानिमित्त दूध संस्थांना- सभासदांना भेटवस्तू वाटप कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

आ. राजेश पाटील, पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी आ. संजय घाटगे, सुजित मिणचेकर, के.पी.पाटील, माजी अध्यक्ष विश्वास पाटील, भैय्या माने, ए.वाय. पाटील, आदील फरास, बाबासाहेब आसुर्लेकर यांच्यासह गोकुळ दूध संघाचे संचालक उपस्थित होते.

Ajit Pawar Kolhapur
Gokul Milk Sangh Kolhapur : गोकुळच्या कारभारावर अजित पवार म्हणतात गालबोट लावू देऊ नका

एक मिनिटात बक्षिसाची रक्कम झाली १ लाख

'गोकुळ श्री' पुरस्काराच्या माध्यमातून प्रतिदिन सर्वाधिक दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना ३० हजार, पंचवीस हजार, वीस हजार असे अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाला बक्षीस दिले होते. त्यानंतर, उपमुख्यमंत्री पवार यांनी संघाची एवढी मोठी उलाढाल आणि बक्षीस एवढे कमी देता, हे बरोबर नाही.

दूध उत्पादकांना जास्त बक्षीस द्यावे, तुम्ही तुमच्या खिशातील पैसे देत नाही, असे म्हणून आता ज्यांनी गोकुळ श्री पुरस्कारमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे, त्यांना १ लाख, ७५ हजार आणि ५० हजार अशी बक्षिसे द्या, असा आदेश दिला आणि तत्काळ हे बक्षीस मंजूर करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com