Flood Management  Agrowon
ॲग्रो विशेष

Flood Management : कोल्हापूर, सांगलीत पूरनियंत्रण कक्ष सज्ज

Kolhapur Flood : पहिल्या टप्प्यात महिनाभरासाठी ४२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तीन शिफ्टमध्ये हे काम सुरू राहणार आहे.

Team Agrowon

Kolhapr/Sangli News : संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर जलसंपदा विभागाने पूरनियंत्रण कक्ष सुरू केला आहे. यासाठी ४२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे काम चोवीस तास सुरू राहणार आहे. पहिल्या टप्प्यात महिनाभरासाठी ४२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तीन शिफ्टमध्ये हे काम सुरू राहणार आहे. या कालावधीत त्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी दरवर्षी जलसंपदा विभागाकडून हा कक्ष स्थापन करण्यात येतो. त्यानुसार यंदाही हा कक्ष जूनमध्ये सुरू करण्यात आला आहे. असे असले तरी या कक्षाचे प्रत्यक्ष काम हे मे मध्येच झालेल्या संततधार पावसावेळी सुरू झाले आहे. या कक्षातून सकाळी सहा ते दुपारी दोन, दुपारी दोन ते रात्री दहा व रात्री दहा ते सकाळी सहा अशा तीन शिफ्टमध्ये चोवीस तास काम सुरू राहणार आहे.

पंचगंगा पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता मिलिंद किटवाडकर यांची पूरनियंत्रण कक्षप्रमुख व बावडा पाटबंधारे शाखेचे अजय पुंदीकर यांची सहायक म्हणून नियुक्ती झाली आहे. या कक्षातून पूरस्थितीची माहिती जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालयासह इतर संबंधित कार्यालयांना पाठविली जाणार आहे. या कक्षातील सर्व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत.

तसेच नियुक्त्यांचे आदेश रद्द करण्यासाठी कोणीही भेटू नये, असे नियुक्तीच्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांना कळविण्यात आले आहे. तसेच हे काम स्वत:चा कार्यभार सांभाळूनच संबंधितांना करावे लागणार आहे. नियुक्तीच्या आदेशाचा कालावधी पूरस्थितीनुसार वाढविण्यात येणार आहे.

सांगलीत १२६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती

सांगली ः पाटबंधारे विभागाअंतर्गत सांगली पूरनियंत्रण कक्षाचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी पूरनियंत्रण कक्षाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करून क्षेत्रीय स्तरावरून पाणीपातळी अहवाल देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. पूरनियंत्रण कक्ष १ जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत अखंडित कार्यरत ठेवण्यात येणार आहे.

कक्षात १२६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून २४ तास कक्ष सुरू राहणार आहे. या वेळी अभियंता ज्योती देवकर यांच्या हस्ते कक्षाचा प्रारंभ झाला. उपविभागीय अभियंता दयानंद बगली, योगिता थोरात, सहायक अभियंता श्वेता दबडे-पाटील, अधिकारी या वेळी उपस्थित होते.

संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाकडून पूरनियंत्रण कक्ष सुरू केला जातो. त्यानुसार यंदाही हा कक्ष सुरू केला असून त्यासाठी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
- स्मिता माने, कार्यकारी अभियंता, उत्तर विभाग, जलसंपदा विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Inspiring Agroforestry Story: तेलंगणामधील एक सुखद अनुभव

Maharashtra Drought Situation: दुष्काळ चारा नियोजनाचा!

Banana Cultivation Issue: केळी लागवडीसाठी दर्जेदार कंद मिळेनात

Groundnut Seed Issue: ‘कृषी’कडून वितरित भुईमूग बियाण्यांवर शेतकऱ्यांची नाराजी; गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

Shaktipeeth Highway Protest: शक्तिपीठ महामार्गाविरोधात विट्यात महिलांचा मोर्चा

SCROLL FOR NEXT