Khandesh Banana Farming: खानदेशात मृग बहर (जून व जुलैमध्ये लागवडीच्या बागा) केळीची लागवड सुरू आहे. परंतु दर्जेदार कंद मिळत नसल्याने लागवड रखडत सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांना जुनारी (काढणी ९७ ते ९८ टक्के पूर्ण झालेल्या बागा) आणि काढणी ९० टक्के पूर्ण झालेल्या पिलबाग/खोडवा केळी पिकातून कंद आणावे लागत आहेत. .खोडवा व जुनारी केळी बागांमधील कंद हवे तसे अंकुरत नाहीत. तसेच पुढे त्यांची निसवण, काढणी याबाबतही अडचणी असतात. यामुळे शेतकरी काढणी ६० ते ७० टक्के पूर्ण झालेल्या केळी बागांमधील कंद काढून त्यांची पुनर्लागवड करतात. परंतु कंदांचा तुटवडा असल्याने शेतकऱ्यांना कंदांसाठी इतर जिल्ह्यांतही जावे लागत आहे..Banana Rate: केळीचे दर अस्थिरच.अनेक शेतकरी मध्य प्रदेशातील बडवाणी, बऱ्हाणपूर, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, गुजरातमधील निझर किंवा तापी जिल्ह्यातूनही कंद आणत आहेत. उतिसंवर्धित रोपांची मागणीही आहे. परंतु रोपांचे दर २१ ते १८ रुपये प्रतिरोप असे आहेत. अनेक शेतकरी खर्च कमी करण्यासाठी रोपांचा उपयोग टाळून कंदांना पसंती देतात. खानदेशात कमाल शेतकरी किंवा केळी उत्पादक नव्याने लागवडीसाठी काढणी सुरू असलेल्या उतिसंवर्धित बागांमधील ग्रॅण्ड नैन वाणाच्या कंदांना पसंती देत आहेत..Banana Price Crisis: खानदेशात केळीदराचा प्रश्न कायम.तसेच काही शेतकरी सातमासी, आंबेमोहोर, श्रीमंती व इतर वाण निवडत आहेत. खानदेशात विविध वाणांचे कंद उपलब्ध आहेत. परंतु हे कंद जुनारी केळी बागांत अधिक आहेत. काढणी सुरू असलेल्या बागांतून शेतकरी कंद देण्यास नकार देत आहेत. यामुळे कंदांचा तुटवडा आहे..मोफत कंद अपवादानेचकंदांची विक्रीही आता मोठा व्यवसाय खानदेशात बनला आहे. पूर्वी शेतकरी आपल्या बागांमधील कंद मोफत द्यायचे, परंतु आता मोफत कंद अपवादानेच मिळतात. अनेक शेतकरी एक ते सव्वा रुपया दर घेऊन कंद देत आहेत. तसेच गावोगावी कंद पुरवठादार, एजंटही कार्यरत आहेत. .कंद काढण्याची मजुरी व इतर खर्चही लागतो. यामुळे प्रतिकंद दोन ते अडीच रुपये खर्च लागत आहे. यामुळे केळी लागवडीचा खर्च यंदा काहीसा वाढला आहे. कापूस, पपई पीक न परवडल्याने अनेक शेतकरी लागवडीकडे वळले असून यंदा लागवड काहीशी वाढेल, असेही दिसत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.