Sangli Flood & Drought agrowon
ॲग्रो विशेष

Sangli Flood & Drought : सांगली जिल्ह्यात ऐन पावसाळ्यात १ लाख २५ जणांना टँकरने पाणी, तर पुरामुळे हजारो लोकांचे स्थलांतर

Sangli Rain Flood : सांगलीतील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत गेली. त्यामुळे शिराळा, वाळवा, मिरज आणि पलूस या चार तालुक्यांत पूरसदृश स्थिती निर्माण झाली.

sandeep Shirguppe

Sangli Flood Situation : सांगली जिल्ह्यात चार तालुक्यात पुरस्थिती उ‌द्भवली असताना दुष्काळी जत आणि आटपाडी तालुक्यांत ४४ गावे आणि ३६६ वाड्यांना ५१ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये जत तालुक्यातील ३९ आणि आटपाडी तालुक्यातील ५ गावे समाविष्ट आहेत. सव्वा लाखाहून अधिक लोकसंख्येला हा पाणीपुरवठा सुरू आहे.

जिल्ह्यात यंदा निम्मा जुलै झाल्यानंतर पावसाने जोर धरला. कृष्णा आणि वारणा नद्यांच्या खोऱ्यात गेले काही दिवस मुसळधार वृष्टीही झाली. कोयना आणि वारणा धरणांमध्ये सध्या समाधानकारक पाणीसाठा झाला.

मात्र नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत गेली. त्यामुळे शिराळा, वाळवा, मिरज आणि पलूस या चार तालुक्यांत पूरसदृश स्थिती निर्माण झाली. चार हजारांवर नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. गेले दोन दिवस पावसाने उघडीप दिल्याने पाणी पातळी कमी झाली आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागाला दिलासा मिळाला आहे.

एकीकडे, अशी चार तालुक्यांत पूरसदृश स्थिती असताना दुसरीकडे जत, आटपाडी या तालुक्यांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. विशेषकरून जत तालुक्यातील ४१ गावे सध्या टंचाईग्रस्त आहेत. आटपाडी तालुक्यातील सहा गावांमध्ये पाणीटंचाई आहे.

खानापूर तालुक्यातील तीन आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील एका गावात टंचाईची स्थिती आहे. अशा एकूण ५१२ गावांमध्ये टंचाईची परिस्थिती आहे. त्यापैकी जत तालुक्यातील ३९ गावे आणि ३०७ वाड्या, तर आटपाडी तालुक्यातील ५ गावे आणि ५८ वाड्यांना ५१ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

गतवर्षी ३२ टक्के कमी पाऊस झाला होता. त्यामुळे नोव्हेंबरपासूनच दुष्काळ तालुक्यात पाणीटंचाई जाणवली होती. विशेषकरून जत आणि आटपाडी तालुक्यातील गावे टंचाईग्रस्त झाली होती. आता पावसाळा सुरू होऊन दीड महिन्यांचा कालावधी उलटला, तरीही ५१ गावे आणि ३६५ वाड्या टंचाईग्रस्त आहेत. त्यापैकी ४४ गावे आणि ३६५ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

सुमारे एक लाख २६ हजार २०४ लोकसंख्या आणि २८ हजार ३०५ पशुधनाला हा पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्हा सध्या चार तालुक्यांत पूरस्थिती आणि दोन तालुक्यात टंचाई स्थितीचा अनुभव घेत आहे. एकीकडे ४२ हजार लोकसंख्या आणि सुमारे २७०० पशुधनाचे पुरामुळे स्थलांतर करण्यात आले आहे, तर दुसऱ्या बाजूला सव्वा लाख लोकसंख्या २८ हजार पशुधनाला पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

टँकरने पाणीपुरठा सुरू असलली गावे

" जत तालुका : सिंदूर-२, पांदरेवाडी-२, एकुंडी-१, बसर्गी-१, सोन्याळ-२, गुगवाड-र, गिरगाव-१, संख-२, जादरबोबलाद-१, उमराणी-१, माडग्याळ-१, मुचंडी-१, जालिहाळ खु-१, कोळगिरी-१, कों.बोबलाद-१ लमाणतांडा (द.ब.)-१, केरेवाडी (कों.बो.)-९, व्हसपेठ-१, गुलगुंजनाळ-१, करेवाडी (तिकोंडी)-०.५, गोंधळेवाडी-0.4, सिब्नाथ-१, सुसलाब-१, खोजनवाडी-१,अंकलगी-२, मोटेवाडी आ.तु.-१,. मल्ल्याळ-१, लकडेवाडी-0.५, कुलाळवाडी-0.५, बालगाव-१, आसंगी जत-२, बेवनूर-१, आसंगी तुर्क-१, बिळूर-१, उमदी-३, उटगी-१, गुडापूर -१, उंटवाडी-१, अक्कळवाडी-१,

आटपाडी तालुका : विठलापूर -१, पुजाराडी दि-०.५, उंबरगाव-१, विभूतवाडी-१, पिंरी बु-१,दिधंची (वाड्यासाठी)-0.५

एकूण टँकर- ५१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT