Shaktipeeth Highway agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Highway : 'शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या य महामार्गविरोधी लढ्यात खांद्याला खांदा लावून लढणार'

Kolhapur Ajara Tehsil : आजरा तालुक्यातील विस्थापित लोकांच्या पुनर्वसित जमिनी पुन्हा शक्तिपीठ महामार्गासाठी काढून घेतल्या जाणार आहेत.

sandeep Shirguppe

Kolhapur Shaktipeeth : कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांचा तालुका म्हणून ओळख निर्माण झालेल्या आजरा तालुक्यातील विस्थापित लोकांच्या पुनर्वसित जमिनी पुन्हा शक्तिपीठ महामार्गासाठी काढून घेतल्या जाणार आहेत. शक्तिपीठ तर कोल्हापुरात आहे. तेथे जायला कोणत्याही भाविकाने या शक्तिपीठ महामार्गाची मागणी केलेली नाही.

शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचे पाप सत्ताधाऱ्यांनी करू नये. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या या महामार्गविरोधी लढ्यात खांद्याला खांदा लावून उभा राहणार, असा विश्वास माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया व महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आयोजित खेडे (ता. आजरा) येथील प्रचार सभेत ते बोलत होते. संभाजीराजे छत्रपती म्हणाले, 'तालुक्यामध्ये ठिकठिकाणी झालेल्या पाणी प्रकल्पांमध्ये शेतकऱ्यांनी मोठे योगदान दिले आहे.

प्रसंगी स्वतःची घरदारे सोडून विस्थापित झालेली ही मंडळी आता कुठे स्थिरस्थावर होत असताना शक्तिपीठ महामार्गाचा घाट सरकारकडून घातला जात आहे. एकदा विस्थापित झालेल्या या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी पुन्हा एकदा शक्तिपीठ महामार्गासाठी संपादित होण्याची शक्यता आहे.

गरज नसलेल्या या मार्गाकरिता विस्थापितांच्या दृष्टीने जमीन संपादन हे अन्यायकारक आहे. शेतकरी आता जागरूक झाला आहे. या महामार्गाला ठिकठिकाणी विरोध होत आहे. विकासाच्या नावावर गरज नसताना कोट्यवधी रुपये उधळण्याचा हा सरकारचा डाव संघटितरीत्या हाणून पाडूया.'

कॉ. संपत देसाई म्हणाले, 'या देशातील लोकहिताचे नवनवे कायदे कष्टकरी जनतेने लढून करायला भाग पाडले आहेत. पण, भाजप आणि मित्र पक्षांचे हे सरकार चळवळी दडपून टाकत आहेत. म्हणूनच आम्ही दडपशाही करणाऱ्या या सरकारच्या विरोधात इंडिया आघाडीच्या बाजूने उतरलो आहोत.'

यावेळी मुकुंदराव देसाई, उदय पवार, संतोष मासोळे, रणजित देसाई, शांताराम पाटील, राजू होलम, रणजित देसाई, शिवराज देसाई, संकेत सावंत, संतोष पाटील, गंगाराम ढोकरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात संततधार

Fertilizer Mismanagement : कृषी सेवा केंद्रातील खत साठ्यात तफावत

Heavy Rain Dharashiv : धाराशिव जिल्ह्यात पावसाचा हाहाकार

AI In Agriculture : सांगली जिल्हा बँक ‘एआय’साठी देणार अनुदान

Agriculture Marketing : शेतीमाल मार्केटिंग साठी ‘कृषी-पणन’ने एकत्र यावे

SCROLL FOR NEXT