Pune News: राज्यातील शेतकऱ्यांना माती, पाणी, खते, कीटकनाशके आणि बियाणे तपासणीचा अहवाल लवकरच थेट बांधावर उपलब्ध होणार आहे. यासाठी कृषी अधिकारी व महाआयटीचे तंत्रज्ञ संयुक्तपणे एक ऑनलाइन प्रणाली तयार करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. .‘आपले सरकार’ संकेतस्थळावर ‘शेतकरी सेवा’ या पट्टीवर शेतकऱ्यांना घरपोच निविष्ठा तपासणी अहवाल मिळण्यासाठी विशेष सुविधा तयार केली जात आहे. येथे शेतकऱ्याला ऑनलाइन अर्ज तसेच तपासणी शुल्क भरता येईल. गावाच्या टपालघरातून या शुल्काची पावती तसेच निविष्ठा नमुना प्रयोगशाळेकडे पाठवता येईल. ‘‘निविष्ठा नमुना प्रयोगशाळेत प्राप्त होताच दोन आठवड्याच्या त्याची आत तपासणी होईल..Agriculture Department: कृषी विभागाला मिळेना मुख्य सांख्यिक.तपासणी कामात दिरंगाई होऊ नये म्हणून या कामाला सेवा हमी कायदादेखील लागू असेल,’’ अशी माहिती कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली. प्रयोगशाळांमधील तपासणी अहवालाचे निष्कर्ष शेतकऱ्यांना ई-मेल किंवा भ्रमणध्वनीवर पुरविले जातील..Agriculture Department: कृषी विभागाचा सुधारित आकृतिबंध पुन्हा चर्चेत.विशेष म्हणजे सरकारी प्रयोगशाळांमधून निविष्ठांची तपासणी केल्यानंतर त्याच्या वापरासंबंधी नियोजन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढते आहे. खत तपासणीच्या पाच प्रयोगशाळा असून वर्षभरात एक हजाराहून अधिक शेतकरी वैयक्तिकपणे खत तपासून घेत आहेत. त्यासाठी शेतकरी गट, शेतकरी कंपन्यांची संख्याही वाढते आहे..कृषी आयुक्त सूरज मांढरे, गुणनियंत्रण संचालक सुनील बोरकर यांच्या मार्गदर्शनासाठी या प्रणालीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यासाठी प्रयोगशाळा उपसंचालक नितीन फुलसुंदर तसेच विविध प्रयोगशाळांमधील विश्लेषक व महाआयटीचे तंत्रज्ञ एकत्रितपणे या संकल्पनेला अंतिम टप्प्यात नेत आहेत..उर्वरित अंश तपासणी सवलतीतकीडनाशकांच्या उर्वरित अंश (रेसिड्यू) तपासणीसाठी कृषी विभागाच्या प्रयोगशाळा खासगी कंपन्यांकडून १५५०० रुपयांपर्यंत शुल्क घेतात. मात्र, शेतकरी, बचत गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी हेच शुल्क केवळ पाच हजार रुपये (अधिक जीएसटी) आहे. याशिवाय खतासाठी प्रति घटक ५० रुपये, बियाणे प्रतिनमुना ४० रुपये, माती ५० रुपये, पाणी तपासणीचे शुल्क १०० रुपये आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.