Mango Season Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Festival : छत्रपती संभाजीनगरमध्ये आंबा महोत्सवाची तयारी

Mango Season : महाकेसर आंबा बागायतदार संघाची सर्वसाधारण मासिक सभा जिल्हा जिल्हा दूध संघाच्या कार्यालयात पार पडली. महाकेसर आंबा बागायतदार संघाचे अध्यक्ष नंदलाल काळे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : महाकेसर आंबा बागायतदार संघातर्फे महाराष्ट्र राज्य कृषी पणन‌ मंडळ यांच्या सहकार्याने छत्रपती संभाजीनगर येथे २० मे च्या दरम्यान पाचदिवसीय आंबा महोत्सव आयोजित करण्याविषयी सविस्तर प्राथमिक चर्चा झाली.

महाकेसर आंबा बागायतदार संघाची सर्वसाधारण मासिक सभा जिल्हा जिल्हा दूध संघाच्या कार्यालयात पार पडली. महाकेसर आंबा बागायतदार संघाचे अध्यक्ष नंदलाल काळे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. बैठकीत अनेक विषयावर चर्चा झाली.

काही निर्णयही बैठकीत घेण्यात आले. छत्रपती संभाजीनगर येथे केंद्रीय आंबा फळ संशोधन केंद्राची उपशाखा व्हावी यासाठी खासदार संदीपान भुमरे यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्याचे ठरले. महाकेसरचे संस्थापक अध्यक्ष सुशील बलदवा यांना नुकताच मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज अचिवमेंट ॲवॉर्डने सन्मानित करण्यात आले.

त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. मासिक सभेला संघाचे अध्यक्ष काळे यांच्यासह डॉ. भगवानराव कापसे, सुशील बलदवा, विश्‍वनाथ दहे,‌ रसूल शेख, प्रकाश कापसे, त्र्यंबक पाथ्रीकर उपस्थित होते. विश्‍वनाथ दहे यांनी आभार मानले. कल्टार, क्रॉप कव्हरसाठी कराराची तयारी

आंब्यासाठी अति महत्त्वाची निविष्ठा म्हणजे कल्टार. हे कल्टार सर्वसाधारण मार्केटमध्ये फार महाग असते. यात बागायतरांची फसवणूक मोठ्या प्रमाणात होते. हा विचार करून या वर्षी महाकेसर आंबा बागायतदार संघातर्फेच सिंजेंटा कंपनीकडून होलसेल करार करून कल्टार घेऊन शेतकऱ्यांना पुरविण्याचा निर्णय झाला. या वेळी डॉ. भगवानराव कापसे यांनी सिंजेंटा कंपनीचे रिजनल मॅनेजर यांच्याबरोबर याविषयी प्राथमिक चर्चा केली.

फळगळीचा वाढला धोका

आंबा काही बागांमध्ये ५० ग्राम ते १७५ ग्राम वजनाचा झालेला आहे. अशातच रात्रीचे तापमान एकदम कमी तर दिवसाचे तापमान अगदी ३७-३८ अंशपर्यंत गेले आहे. त्यामुळे फळगळीचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला याविषयी डॉ. कापसे यांनी मार्गदर्शन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Supply: जेवढी शेतीसाठी गरज, तेवढेच खत शेतकऱ्यांना मिळणार, कृषी विभागाचा निर्णय

Crop Insurance: शेतकऱ्यांना खरिपासाठी एकूण किती भरपाई आतापर्यंत मंजूर झाली?

Parbhani Kharif Planning: खरिपासाठी ७९ हजार ५२२ क्विंटल बियाण्याची मागणी

DJ Noise Incident: लग्नाच्या वरातीत डीजेचा दणदणाट, १४० कोंबड्यांचा मृत्यू, गुन्हा नोंद

Mango Loss 2026: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे सुरू

SCROLL FOR NEXT