Maharashtra Fertilizer Supply News Updates: मध्य पूर्वेतील युद्धामुळे आगामी खरीप हंगामात देशात खताची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या कृषी विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जेवढी गरज, तेवढेच खत मिळेल. जर तुम्हाला ५ गोण्यांची गरज असेल, तर तेवढेच खत मिळेल, अशी वितरण यंत्रणा राहील. त्याचा अॅग्रीस्टॅकशी संबंध जोडून गरजेप्रमाणे पुरवठा या सुत्रानुसार व्यवस्था काम करेल, असे कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले आहे. .४०० परवाने निलंबित, ५ ठिकाणी गुन्हे नोंदलिंकिंगच्या नावाखाली शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवण्यासाठी कृषी विभागाने कडक पावले उचलली आहे. याबाबत बोलताना मांढरे यांनी सांगितले की, कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा संप सुरुच आहे. याबाबत कृषीमंत्र्यांसोबत सविस्तर बैठक झाली. त्यांनी १४ मागण्या केलेल्या आहेत. त्यातील बहुतांश मागण्या मान्य करण्यासारख्या आहेत. त्यावर आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत ६ हजार दुकानांची तपासणी केली. यादरम्यान ४०० परवाने निलंबित केले आहेत. जिथे दोष दिसून आला; तिथे कारवाई केली जात आहे. तर पाच ठिकाणी एफआयआर दाखल झाले आहेत.राज्यात बियाण्यांचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचेही कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. .Fertilizer Linking Ban: अनुदानित खतांसोबत ‘लिंकिंग’ला मनाई.कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या अडचणी सोडविण्याच्या मागणीसाठी संप सुरु आहे. या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकतीच एक बैठक घेतली. यावेळी उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही खते लिकिंग बंद करण्याबाबत लवकरच ठोस निर्णय घेणार असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले. यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार राजेश बकाने, ऑनलाईन कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, कृषी आयुक्त सुरज मांढरे, कृषी संचालक सुनिल बोरकर, महाराष्ट्र फर्टीलायझर्स पेस्टिसाइज सीड्स डीलर असोसिएशन म्हणजे माफदा संघटनेचे विनोद तराळ पाटील, ऑल इंडियाचे अध्यक्ष मनमोहन कलंतरे यासह संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते..Fertilizer Dealers Strike: कृषी निविष्ठा विक्रेते संपावर.शेजारील राज्यातून येणाऱ्या अप्रमाणित एचटीबीटी कपाशी बियाण्यांवर कडक कारवाई करण्यासाठी केंद्र आणि गृह विभागाशी समन्वय साधला जात आहे. तसेच बियाण्यांच्या उत्पादनापासून विक्रीपर्यंत पारदर्शकता यावी यासाठी ‘साथी’ पोर्टलचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन विक्रेत्यांना करण्यात आले आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.