
Chhatrapati Sambhajinagar News: मराठवाड्यासह राज्यातील केसर आंब्याचा हंगाम यंदा पंधरा दिवस लांबणीवर पडण्याचा अंदाज आहे. यंदा पाऊस चांगला झाला. मध्यंतरी सात-आठ दिवसांतील थंडीच्या ‘शॉक’ आणि पॅक्लोब्युट्राझोल दिलेल्या बागांमधील मोहराचा कालावधी लांबल्याने हा परिणाम झाल्याचे आंबा तज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे म्हणाले.
राज्यात कोकण वगळता सुमारे ६५ हजार हेक्टरवर केसर आंब्याची लागवड आहे. त्यापैकी दहा ते बारा हजार हेक्टरवरील केसर आंबा बागा चांगल्या उत्पादनक्षम आहेत. साधारणपणे सोलापूर, सांगली, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर तसेच मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांसह विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये केसर आंब्याची लागवड मोठ्या प्रमाणात आहे.
अलीकडे आंब्याचे उत्पादन व्यावसायिक दृष्टिकोनातून घेण्याच्या अनुषंगाने शेतकरी विविध उपाय योजत आहेत. डॉ. कापसे यांच्या माहितीनुसार, यंदा साधारणतः जुलै, ऑगस्टमध्ये पॅक्लोब्युट्राझोल वापरलेल्या केसर आंबा बागांमध्ये नोव्हेंबरमध्ये मोहोर अपेक्षित होता, परंतु हा कालावधी थोडेसा लांबला आहे. त्यातही सुरुवातीला लागलेला मोहर उमलताना थंडीचा शॉक लागल्यावर परपरागीकरणाची प्रक्रिया अपेक्षेनुसार झाली नाही, त्यामुळे काही मोहर जळाला.
इतर मोहर मात्र उत्तमरीत्या तयार झाला. यंदा फारशी थंडी नसल्याने केसर आंबा झपाट्याने वाढतो आहे. त्याची आकारही चांगला असण्याची आशा आहे. १५ फेब्रुवारीनंतर तापमान ३५ अंश सेल्सिअसच्यावर गेल्याने फळगळ वाढण्याची शक्यता आहे. सध्याच्या काळात बागेतील आर्द्रता टिकविण्यासाठी एक ते दोन मोकळे पाणी द्यावे. नैसर्गिक आपत्ती वगळता उन्हाचा चटका वाढला तर फळांचा आकार लहान होण्याची शक्यता आहे. त्यासाठी बँगिंगचा पर्याय शेतकरी निवडू शकतात. यामुळे फळाचा आकार वाढण्यासोबतच फळमाशीवर नियंत्रित करता येऊ शकेल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.