Cotton Seeds Agrowon
ॲग्रो विशेष

Seed Black-market : ‘कृषी’च्या अधिकाऱ्यालाच जादा दराने बियाणे विक्री

Agriculture Department : मागणी असलेल्या कापसाच्या बियाण्याची जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातील मोहीम अधिकाऱ्यालाच जादा दराने विक्री केली.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : मागणी असलेल्या कापसाच्या बियाण्याची जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातील मोहीम अधिकाऱ्यालाच जादा दराने विक्री केली. त्यानंतर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यात जास्ती दराने बियाणे विक्री करण्यासाठी ठेवलेले एक लाख ४१ हजार ६९६ किमतीची कापसाच्या बियाण्याची पाकिटे पथकाने जप्त केली.

संबंधित कृषी सेवा केंद्र चालकावर गुन्हा दाखल केला आहे. नगर जिल्ह्यातील नेवासा येथे ही कारवाई झाली आहे. मुकिंदपूर (ता. नेवासा) येथील कृषी सेवा केंद्रात मागणी असलेल्या कापसाच्या बियाण्याची जादा दराने विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी अमृत गांगर्डे यांना बनावट ग्राहक म्हणून तेथे पाठविले.

त्यावेळी ८६४ रुपयांचे पाकीट ११०० रुपयाला मिळाले. त्यानंतर जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी नीलेश कानवडे, जिल्हा मोहीम अधिकारी अमृत गांगर्डे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक राहुल ढगे आदींच्या पथकाने श्रीदत्त कृषी सेवा केंद्राविरूद्ध कारवाई केली.

प्रताप कोपनर यांच्या फिर्यादीवरून संबंधित कृषी केंद्र चालक प्रकाश रावसाहेब शेजूळ यांच्यावर कापूस बियाणे कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

‘‘बियाणे विक्रेते तसेच खासगी लोकांनी शेतकऱ्यांची लूट सुरू केली आहे. त्यामुळे कापसाच्या बियाण्याची जादा दराने विक्री तसेच काळाबाजार करणारी टोळी सक्रिय असल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबत खोलात जाऊन शोध घेत कारवाई करावी.
- संभाजी दहातोंडे पाटील, प्रदेशाध्यक्ष, शेतकरी मराठा महासंघ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mango Crop Disease: आंबा पिकावरील ‘लीफ वेबर’

Goat Health Care: शेळ्यांमधील फुप्फुसदाहाची लक्षणे अन् उपाययोजना

Women Success Story: वडिलांचे शेती प्रेम, तळमळीने डॉक्टर कन्या झाली शेतकरी

Indigenous Seeds Conservation: देशी बियाणे संवर्धनाचा घेतलाय वसा

Maharashtra Nagar Parishad Nagar Panchayat Elections Result: मतदारांचा कौल कुणाला?; मतमोजणीला सुरुवात

SCROLL FOR NEXT