Cotton Seed : कपाशी बियाणे चढ्या भावाने विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल

Seed Rate : कपाशी बियाण्याची चढ्या दराने विक्री केल्याप्रकरणी माजलगाव येथील महावीर ॲग्रो एजन्सीचे मोहित मिठूलाल तातेड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Cotton Seeds
Cotton SeedsAgrowon

Beed News : कपाशी बियाण्याची चढ्या दराने विक्री केल्याप्रकरणी माजलगाव येथील महावीर ॲग्रो एजन्सीचे मोहित मिठूलाल तातेड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहितीनुसार, खरीप हंगामासाठी कपाशी व इतर पिकाचे बियाणे एम. आर. पी.च्या दराने विक्रीसाठी सर्व कृषी सेवा केंद्रावर उपलब्ध झाले आहे. मात्र ३० मे रोजी महावीर अॅग्रो एजन्सी जुना मोंढा माजलगाव येथे कापूस बियाण्याची किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करण्यात येत होती.

Cotton Seeds
Cotton Seed Shortage : सरळ कापूस वाणांचा खानदेशात तुटवडा

विक्रीची माहिती काही शेतकऱ्यांकडून प्राप्त झाल्यावर कृषी विभागाच्या भरारी पथकाने त्या कृषी सेवा केंद्राची तपासणी केली. त्या वेळी त्या ठिकाणी पिंपरी खुर्द येथील शेतकरी यांनी तुलसी कंपनीचे कब्बड्डी वाण ११०० रुपये आणि राशी कंपनीचे आरसीएच ७७९ हे १०५० रुपये प्रति पाकीट खरेदी केल्याची माहिती दिली तसे लेखी दिले.

Cotton Seeds
Cotton seed Varieties : लागवड पद्धतीनुसार कपाशी वाणाची निवड

कपाशी बियाण्याची प्रति पाकीट ८६४ रुपये प्रमाणे कमाल विक्री किंमत असून, सदरील कृषी सेवा केंद्रामार्फत चढ्या दराने विक्री होत असल्याचे आढळून आल्यामुळे व कापूस बियाणे विक्रीचा परवाना नसल्यामुळे त्या कृषी सेवा केंद्रावर महाराष्ट्र कापूस बियाणे कायदा २००९ कलम ४, १०, कापूस बियाणे किंमत नियंत्रण आदेश २०१५ खंड ५, महाराष्ट्र कापूस बियाणे (पुरवठा, वितरण, नियंत्रण व किमतीचे निश्‍चितीकरण) कायदा २००९ (अधिसूचना ७ मे २०१०)कलम ४ व ५ नुसार माजलगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृषी विभागाकडून जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक के. एस. अंबुरे यांनी या प्रकरणी तक्रार दिली. या प्रकरणातील पथकामध्ये कृषी विकास अधिकारी सय्यपा गरंडे, माजलगाव तालुका कृषी अधिकारी शिवप्रसाद संगेकर, तंत्र अधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी जनार्दन भगत, आणि माजलगाव पंचायत समिती विस्तार अधिकारी धम्मदीप गडपाळे हे उपस्थित होते. शासकीय पंच म्हणून धारूरचे कृषी अधिकारी चेतन कांबळे व कृषी सहायक गजानन राजरपल्लू हे उपस्थित होते, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com