Cotton Seeds  Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Seed Sale : कापूस बियाण्यांची ‘ऑन’मध्ये विक्री

Cotton Seed : पाकिटामागे अडीचशे ते तीनशे रुपये जास्त; ठरावीक वाणांच्या तुटवड्याचा परिणाम

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Kharif Season : यवतमाळ : खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच कापूस बियाणे ‘ऑन’मध्ये विकला जात आहे. शेतकऱ्यांकडून जादा मागणी असलेल्या कापूस बियाण्यांच्या पाकिटामागे अडीचशे ते तीनशे रुपये जादा घेतले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांवर अतिरिक्त खर्चाचा बोजा येणार आहे.

खरीप हंगाम शेतकऱ्यांचा अत्यंत महत्त्वाचा हंगाम आहे. येत्या काही दिवसांत हंगामाला सुरुवात होणार आहे. त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी आतापासून नियोजनाला सुरुवात केली आहे. यंदा कापूस बियाणे कंपन्यांना पावसाचा फटका बसला आहे. चांगल्या प्रतीच्या बियाण्यांचा तुटवडा जाणवण्याची शक्यता कृषी केंद्रचालकांकडून व्यक्त होत आहे.

खरिपासाठी आतापासूनच शेतकऱ्यांनी कापूस बियाण्यांची बुकिंग सुरू केली आहे. काही ठरावीक वाणाला शेतकऱ्यांची विशेष पसंती आहे. त्यामुळे मागणी असलेल्या वाणाचा पुरवठा जिल्ह्यात कमी होत आहे. शंभर पाकिटांची बुकिंग करणाऱ्या विक्रेत्याला दहा पाकीट दिले जात आहे. यामुळे कापसाच्या काही विशिष्ट वाणाची मागणी वाढली आहे. मागणी असलेल्या वाणाची विक्री ‘ऑन’मध्ये केली जात आहे. कपाशी पाकिटावर दोनशे ते तीनशे रुपये अतिरिक्त घेतले जात आहे. यापूर्वी खतांसोबत इतर खतांची लिंकिंग होत असल्याचा प्रकार होता.

आता बियाण्यांची मागणी आणि उपलब्धता पाहता बियाण्यांसोबतही लिंकिंग सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खरीप हंगाम काही दिवसांवर आला आहे. शेतकऱ्यांचा कल कापूस लागवडीकडे आहे. काही वाणांना मागणी असल्याने वाणांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. आपल्याला बियाणे मिळावे यासाठी शेतकरी तयारीत आहे. यासाठी ८६४ रुपयांचे बियाणे बाराशे ते तेराशे रुपयाला विकण्याची तयारी काहींनी सुरू केली आहे.

कृषी सेवा केंद्रचालकांना पुरवठा कमी
आम्ही मागणी असलेल्या वाणाची बुकिंग आधीच केली आहे. कंपनीला पैसेसुद्धा दिले आहे. हंगाम तोंडावर असताना मागणी असलेल्या बियाण्याचा तुटवडा असल्याचे कंपनीकडून सांगितल्या जात आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीकडून माल पाठविण्यात आला. एका पेटीतील दहा-दहा पाकीट तीन कृषिसेवा केंद्रचालकांना देण्यात आले. त्या वाणाला मागणी असल्याने ‘ऑन’मध्ये विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची प्रतिक्रिया नाव न छापण्याच्या अटीवर दारव्हा तालुक्यातील एका कृषी सेवा केंद्रचालकाने दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ajit Pawar & Anjali Krishna : अजित पवारांनी मुरूम उपशासाठी पोलिस उपअधीक्षकांना धमकावलं; शेतकरी नेत्यांचा आरोप

Fruit Farming : फलोत्पादनात अकोला घेतोय आघाडी

Agriculture Technology: अन्नप्रक्रियेतील आधुनिक तंत्रज्ञान ‘पल्स इलेक्ट्रिक फील्ड’

Farm Road : शेतकऱ्यांच्या शेतरस्त्यांना आता सीमांकनासह विशिष्ट क्रमांक

Fertilizer Overpricing : खतांची चढ्या दराने विक्री भोवली

SCROLL FOR NEXT