Hingoli News Update : हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या (२०२३) खरीप हंगामात विविध पिकांच्या ६४ हजार ४४९ क्विंटल बियाण्याचा व कपाशी बियाण्याच्या १ लाख १ हजार ५३० पाकिटांचा पुरवठा झाला. मंगळवार (ता. २०) अखेरपर्यंत एकूण १७ हजार ४८ क्विंटल बियाण्याची व कपाशी बियाण्याच्या ३५ हजार ९३० पाकिटांची विक्री झाली, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
हिंगोली जिल्ह्यात यंदा विविध खरीप पिकांची ३ लाख १३ हजार ९०२ हेक्टरवर पेरणी व कपाशीची ३२ हजार १५९ हेक्टरवर लागवड प्रस्तावित आहे. त्यासाठी खरीप पिकांच्या ७१ हजार ८८८ क्विंटल बियाण्याची मागणी बीजोत्पादकाकडे करण्यात आली आहे.
त्यात सार्वजनिक क्षेत्रातील उत्पादकांकडील ६ हजार ६६५ क्विंटल व खासगी बियाणे कंपन्याकडील ७१ हजार ८८८ क्विंटल बियाण्याचा समावेश आहे. खासगी कंपन्यांकडे कपाशी बियाण्याच्या १ लाख १ हजार ५३० क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली आहे. एकूण ६४ हजार ४४९ क्विंटल बियाण्याचा पुरवठा झाला आहे.
सोयाबीनच्या एकूण ६२ हजार ६६ क्विंटल बियाणे पुरवठा झाला. त्यात सार्वजनिक क्षेत्रातील बियाणे उत्पादकाकडून २ हजार २६१ क्विंटल व खासगी कंपन्यांचे ५९ हजार ८१८ क्विंटल बियाणे आहे.
ज्वारीचे १५५ क्विंटल, मुगाचे २५८ क्विंटल, उडदाचे २०० क्विंटल, तुरीचे १ हजार ७५२ क्विंटल, मकाचे १४ क्विंटल बियाण्याचा पुरवठा झाला आहे. विक्री झालेल्या बियाण्यामध्ये सोयाबीनचे १६ हजार ६४३ क्विंटल, ज्वारीचे ४५ क्विंटल, मुगाचे ५८ क्विंटल, उडदाचे ५९क्विंटल, तुरीचे ३३४ क्विंटल बियाणे आहे.
शिल्लक बियाण्यात सोयाबीनचे ४५ हजार४२३ क्विंटल, ज्वारीचे११० क्विंटल, मुगाचे १९९ क्विंटल, उडदाचे १४०क्विंटल, तुरीचे १ हजार ४१८ क्विंटल बियाणे तसेच कपाशीच्या बियाण्याची ६५ हजार ६०० पाकिटांचा समावेश आहे.
दरम्यान, जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाचे कमी आहे. बियाण्याची व्यवस्थित उगवण होण्यासाठी आवश्यक पुरेसा ओलावा जमिनीत उपलब्ध झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी उत्तम वाघमारे यांनी केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.