Bogus Seed Selling : वाळूमाफिया, बोगस बियाणे विक्रेते ‘रडार’वर

Jalgaon Collector Office News : जिल्हाधिकारी मित्तल हे अधिकाऱ्यांची बैठक व महसूल कामकाजाची पाहणी करण्यासाठी पाचोरा येथे होते. त्यांनी प्रांताधिकारी कार्यालयाच्या सभागृहात तालुक्यातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना त्यांचे कर्तव्य व जबाबदारी संदर्भात जाणीव करून दिली.
Sand
Sand Agrowon
Published on
Updated on

Jalgaon News : संपूर्ण जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीने कहर करून कळस गाठला असून, ही वाळू वाहतूक रोखणे व शासनाच्या नियमानुसार वाळू वितरण करणे या संदर्भात संपूर्ण यंत्रणा अलर्ट केली असून, विना क्रमांकाची वाहने, अवैध वाळू वाहतूक व बोगस बियाण्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक या गोष्टीकडे कदापी दुर्लक्ष होणार नाही व असा प्रकार करणाऱ्यांची गय करणार नसल्याचा निर्वाणीचा इशारा जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी पाचोरा येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

जिल्हाधिकारी मित्तल हे अधिकाऱ्यांची बैठक व महसूल कामकाजाची पाहणी करण्यासाठी पाचोरा येथे होते. त्यांनी प्रांताधिकारी कार्यालयाच्या सभागृहात तालुक्यातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना त्यांचे कर्तव्य व जबाबदारी संदर्भात जाणीव करून दिली. कर्तव्यात व कायदा नियमावलीच्या विरोधात कामकाज केल्यास कारवाईचा इशाराही दिला.

जिल्हाधिकारी मित्तल यांनी प्रांताधिकारी दालनात त्यांनी पत्रकार परिषदेत घेऊन स्पष्ट केले, की ‘शासन आपल्या दारी’ या अभिनव उपक्रमास सुरुवात झाली असून, हे अभियान प्रत्येक लाभार्थ्याला लाभ मिळेपर्यंत सुरू राहणार असल्याचे सांगून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शासकीय योजनांचा आराखडा तयार करून तो शासन दरबारी सादर होणार आहे.

Sand
Jalgaon Rain News : खानदेशात पावसाची हुलकावणी

संपूर्ण अहवालप्राप्त झाल्यानंतर अवघ्या २१ दिवसांत संपूर्ण योजनांना मंजुरी देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या असल्याचे सांगून शिधापत्रिका व अवैध वाळू वाहतुकीसंदर्भातील हेल्पलाइनचा वापर सर्वांनी करावा.

आपल्या मागण्या व तक्रारी हेल्पलाईनवरून टाकल्यास त्याची दखल घेतली जाईल. ज्यांना रेशन मिळत नाही त्यांची यादी तयार केली जाणार असल्याचे सांगून एकही लाभार्थी लाभापासून वंचित राहू देणार नसल्याचे स्पष्ट केले.

वाळू वाहतुकीवर सर्व शासकीय यंत्रणांची करडी नजर राहणार असून, विना क्रमांकाचे ट्रॅक्टर, ट्रॉली, डंपर मिळून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. बोगस बियाण्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रकारही खपवून घेतला जाणार नाही.

पाऊस सुरू झाल्याने आता पेरण्यांना प्रारंभ होणार असून, याच काळात शेतकरी गडबडीत असल्याने त्यांची फसवणूक होते. फसवणूक करणाऱ्यासंदर्भात तक्रारी आल्यास त्याची गांभीर्याने दखल घेऊन कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com