Sakal Swasthyam  Agrowon
ॲग्रो विशेष

Sakal Swasthyam 2023 : पुण्यात एक ते तीन डिसेंबरला आरोग्यमेळा

Health : ‘सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम्’ या तीन दिवसीय उपक्रमाच्या माध्यमातून ध्यान-धारणा, योग-प्राणायाम, भावनिक, मानसिक, सामाजिक, आध्यात्मिक वर्तणूक आणि स्वास्थ्यपूर्ण आरोग्य आदी विविध क्षेत्रांतील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक तज्ज्ञ मार्गदर्शक संवाद साधणार आहेत.

Team Agrowon

Pune News : कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आणि संपूर्ण निरोगी जीवनशैलीसाठी उपयुक्त व मार्गदर्शक ठरणाऱ्या ‘सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम्’ हा बहुचर्चित उपक्रम १ ते ३ डिसेंबरदरम्यान म्हात्रे पुलाजवळील डीपी रस्त्यावरील पंडित फार्ममध्ये होणार आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध तज्ज्ञांसह उपक्रमाच्या पहिल्या दिवशी प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित, डॉ. श्रीराम नेने उपस्थित राहून प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत.

या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक ‘सुहाना मसाले’, तर पॉवर्ड बाय प्रायोजक ‘भारती विद्यापीठ’, फायनान्शियल हेल्थ पार्टनर ‘लोकमान्य मल्टिपर्पज को - ऑप. सोसायटी लि. (मल्टी स्टेट)’, ऊर्जा पार्टनर म्हणून ‘निरामय वेलनेस सेंटर’, हेल्थ पार्टनर ‘शारंगधर नॅचरल हेल्थ केअर’ आहेत. तसेच सहयोगी प्रायोजक चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि’. व फिनोलेक्स केबल्स लिमिटेड असून, ईव्ही पार्टनर ‘एथर’ आहेत.

‘सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम्’ या तीन दिवसीय उपक्रमाच्या माध्यमातून ध्यान-धारणा, योग-प्राणायाम, भावनिक, मानसिक, सामाजिक, आध्यात्मिक वर्तणूक आणि स्वास्थ्यपूर्ण आरोग्य आदी विविध क्षेत्रांतील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक तज्ज्ञ मार्गदर्शक संवाद साधणार आहेत. याचबरोबर उपक्रमांतर्गत ‘समग्र सृष्टीचे कल्याण आणि माइंडफुल लिव्हिंग’ या विचारधारेवर प्रकाश टाकणाऱ्या ‘स्वास्थ्यम्’ या पुस्तकाचे प्रकाशन या प्रसंगी करण्यात येणार आहे.

‘स्वास्थ्यम्’ का उपयुक्त?

धावपळीच्या व स्पर्धात्मक युगात मानसिक आरोग्य सुदृढ ठेवणे आवश्यक आहे. चिंता, काळजी, भीती, ताण-तणाव वाढत असून, त्यातून नैराश्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. मानसिक समस्या व एकूणच मानसिक स्वास्थ्यासाठी समुपदेशन व योग्य मार्गदर्शन होणे गरजेचे आहे.

तसेच, प्रत्येक पाच व्यक्तींमागे एका व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचा मानसिक व शारीरिक त्रास होत असतो. त्यातील फक्त दहा टक्के लोकांना उपचार मिळतात. चांगले शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी निरोगी जीवनशैली आवश्यक आहे. त्यासाठी ‘सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम्’ नागरिकांना उपयुक्त ठरणार आहे.

खालील विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला भेट द्या

Instagram:

instagram.com/globalswasthyam

Facebook:

facebook.com/globalswasthyam

Twitter:

twitter.com/GlobalSwasthyam

कधी व कुठे?

१ ते ३ डिसेंबर- २०२३, पंडित फार्म, कर्वेनगर, पुणे.

‘सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम्’ उपक्रमाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी globalswasthyam.com या वेबसाइटला भेट देऊ शकता. उपक्रमात प्रवेश विनामूल्य असून, उपक्रमात सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. रजिस्ट्रेशनसाठी सोबतचा क्यूआर कोड स्कॅन करा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Inspiring Farmer Story: दौंड्या काठची आरती अन् दीपक

Crop Loss Relief: अतिवृष्टी अनुदानाचे २५३ कोटी रुपये पोर्टलवर अपलोड

Chana Characteristics: हरभरा वाणांची गुणवैशिष्ट्ये

Leopard Sighting: वाहोलीपाडा परिसरात बिबट्याची दहशत

Foodgrain Production: यंदा देशात धान्य उत्पादनात सुधारणा, पण बंपर पीक नाही, कृषी विभागाचा अंदाज काय सांगतो?

SCROLL FOR NEXT